shani gochar 2022 : शनि प्रकोपापासून वाचण्यासाठी हे उपाय कराच.
हे उपाय केल्यास बदलून जाईल नशीब! शनिदोषातूनही होईल सूटका. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताला कृपाशीर्वाद देतात.
मुंबई : आज 30 एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या असे संबोधले जाते. 29 एप्रिलपासून शनि आपल्या कुंभ राशीत 30 वर्षानंतर पुन्हा परत येत आहे. शनिच्या या राशीबदलाचा प्रत्येक राशीवर परिणाम होणार आहे.
29 एप्रिल 2022 रोजी शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ राशीमध्ये होणारे शनीचे आगमन सर्व राशींवर परिणाम करेल. पण, ज्यावर त्याचा जास्त प्रभाव पडणार आहे या राशी कोणत्या हे जाणून घेऊ.
मेष : या राशीच्या लोकांना शनिचा त्रास होणार आहे. कोर्टात चकरा माराव्या लागतील. वादविवाद होतील, पण ही परिस्थिती टाळता येईल. पैसे वाचवा कारण कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते.
सिंह : सिंह राशीच्या लोकांच्या कामात अडथळे येतील. नियोजन करून कामे करावी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे. दुष्कृत्य करणे, इतरांचे ऐकणे हे हि टाळावे. अन्यथा नुकसान आलेच म्हणून समजा. ध्येय पूर्ण करण्यात आव्हाने निर्माण होतील.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना संतती आणि नातेसंबंधात समस्या निर्माण होतील. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांना काही अडचणी आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते.
हे उपाय केल्यास बदलून जाईल नशीब ! शनिदोषातूनही होईल सूटका. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताला कृपाशीर्वाद देतात.
- दीनदुबळ्यांना अन्नदान करावे.
- गरजू लोकांना बूट, चप्पल, कपडे दान करावे.
- दर शनिवारी शनि मंदिर किंवा हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला शेंदूर अर्पण करावा. या शिवाय या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करावे.
- नदीत स्नान केल्याने दोष धुतले जाऊन शनिदेव प्रसन्न होतात.
- काळे उडीद, काळ्या घोड्याची नाल, निळे कापड, काळे तीळ, स्टीलची भांडी, लोखंडाच्या वस्तू दान करावे.
- शनि चालीसाचा पाठ करावा. शनिला नैवेद्य द्यावा.
- शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करावे.
- गरीब आणि कष्टकरी लोकांचा आदर करा.
- उन्हाळ्यात काळी छत्री दान करावी.
या मंत्राचा जप करा
दर शनिवारी शनीदेवाच्या 'ओम प्रीम प्रौं सह शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा.
( विशेष सूचना : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. )