Mahila Naga Sadhu: भारत हा अध्यात्मिक परंपरा जपणारा देश आहे. भारतात अध्यात्माशी निगडीत अनेक रहस्यमयी गोष्ट आहेत ज्या सर्वांनाच थक्क करतात. या पैकीच एक आहेत ते नागा साधू. नागा साधू हे अत्यंत रहस्यमयी जीवन जगतात. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील आहेत. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही नग्न फिरतात. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही ठराविक वेळेतच जगासमोर येतात. 


महिला नागा साधू कशा बनतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुष नागा साधू नेहमीच चर्चेत असतात. मात्र, महिला नागा साधूंबाबत फारशी चर्चा होत नाही. महिला नागा साधूंची संख्या फारच कमी आहे. कठोर तपश्चर्येनंतर महिला नागा साधू बनतात. त्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. नागा साधू बनणण्यासाठी अनेकदा जिवंतपणीच शरीर दान करावे लागते. अनेकांना आपले मुंडण करावे लागते. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू जगापासून दूर जंगलात, गुहा आणि पर्वतांमध्ये राहतात आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहतात. 


महिला नागा साधू नग्न राहतात का?


पुरुषांप्रमाणेच कठोर तपश्चर्येनंतर महिला नागा साधूंना सिद्धी प्राप्त झालेली असते. मात्र, पुरुष नागा साधुंप्रमाणे महिला नागा साधु नग्न राहत नाहीत. स्त्री नागा साधू अंगरखा घालतात, त्यांच्या कपाळावर कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा टिळा असतो. महिला नागा साधु नग्न राहत नाहीत पण त्या भगव्या वस्त्राने आपले अंग झाकतात. या भगव्या वस्त्राला शिलाई नसते. ते अखंड कापड अंगाभोवती गुंडाळतात. 


महिला नागा साधू केव्हा दर्शन देतात?


पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू जगापासून अलिप्त राहतात. त्यांचे दर्शन होणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. महिला नागा साधू केवळ कुंभ, महाकुंभ अशा विशेष प्रसंगी जगासमोर येतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यावर महिला नागा साधू जगापासून पुन्हा अलिप्त होतात. अत्यंत कमी लोकांना या महिला नागा साधूंचे दर्शन झाले आहे. महिला नागा साधूंचे फोटोसुद्धा इंटरनेटवर फारच कमी आहेत. 


टीप - येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.