या` ३ राशींची लोकं पार्टनरवर अजिबातच विश्वास ठेवत नाहीत, संशय हा त्यांचा मूळ स्वभाव
तुमचा जोडीदार देखील कळत नकळत तुमच्यावर संशय घेतो, हा त्याचा मूळ स्वभावच आहे.
मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार, राशीनुसार व्यक्तीचे गुण-अवगुण बदलत आहे. राशीवरून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? हे ओळखता येतं. सोबतच या व्यक्तीचा आपल्याशी व्यवहार कसा असेल याचा देखील अंदाज लावता येतो.
ज्योतिष शास्त्रात काही अशा राशींचा स्वभाव सांगण्यात आलाय. जो पार्टनरला खूप धोकादायक असतो. या राशींच्या व्यक्ती कधीच आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवत नाही. ते आपल्या पार्टनरच्या प्रत्येक कृतीवर संशय घेततात. पाहूया अशा कोणत्या राशी आहेत.
मेष : या राशीचे लोकं थोडे शंका घेणारे असतात. खासकरून या राशींच्या स्त्रीया आपल्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीत. संशयी स्वभाव हा त्यांचा दोषच आहे. एवढंच नव्हे तर या राशींचे लोक अतिशय भावूक असतात. या राशींच्या लोकांना खोटं अजिबातच सहन होत नाही. तशी शंका या राशीच्या लोकांना आली तर मग ती व्यक्ती शांत राहत नाही. ती व्यक्ती आपल्या जोडीदारावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते.
वृषभ : या राशीच्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. पण वृषभ राशीचे लोकं मात्र कुणावरच विश्वास ठेवत नाहीत. या राशीचे लोक खूप जिज्ञासु असतात. आपल्या जोडीदारावर यांची करडी नजर असते. संशयी वृत्तीमुळे यांच्यासमोर कधीच खोटं बोलू नका.
धनू : या राशीचे लोकं रिलेशनशिपमध्ये आपल्या जोडीदाराला अजिबात स्पेस देत नाही. खास करून मुली आपल्या जोडीदाराला एकटं सोडत नाही. कायमच बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवतात. त्याकरता धनू राशीचे लोकं वेगवेगळ्या पर्यायांचा स्वीकार करतात.