Grah Gochar January: जानेवारीत सूर्यासह `या` 4 ग्रहांचं होणार गोचर; काही राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ
Grah Gochar January 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारीला बुध ग्रह वृश्चिक राशीत माग्रस्थ होणार आहे. यासोबतच 15 जानेवारीला सूर्य मकर राशीत आणि 16 जानेवारीला मंगळ धनु राशीत गोचर करणार आहे.
Grah Gochar January 2024: नवीन वर्षाला लवकरत सुरूवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत खूप बदल होणार आहेत. या महिन्यात मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र यांच्या स्थितीत बदल होणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि इतरांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ मिळेल.
ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारीला बुध ग्रह वृश्चिक राशीत माग्रस्थ होणार आहे. यासोबतच 15 जानेवारीला सूर्य मकर राशीत आणि 16 जानेवारीला मंगळ धनु राशीत गोचर करणार आहे. यानंतर 18 जानेवारीला शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. दरम्यान या ग्रहांच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना अच्छे दिन येणा आहेत ते पाहुयात.
मेष रास (Mesh Zodiac)
जानेवारीत ग्रहांच्या गोचरमुळे नवीन वर्ष खूप फायदेशीर ठरू शकते. पैसे गुंतवल्यास फायदा होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर जानेवारी महिना खूप फायदेशीर ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. करिअरमध्येही बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. एखादा मोठा प्रकल्प किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप लकी ठरणार आहे
कन्या रास (Kanya Zodiac)
जानेवारीत ग्रहांच्या स्थिती बदलामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यातून अनेक अडचणी दूर होऊ शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. रणनीती आखून पुढे गेलो तर नक्कीच यश मिळवता येईल. नवीन नोकरीची ऑफर मिळेल. प्रलंबित पैसे परत मिळतील आणि व्यवसायात अपेक्षित यशही मिळेल.
मकर रास (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनावर ग्रहांच्या संक्रमणाचा सकारात्मक प्रभाव पडेल. गुंतवणूक विशेष लाभ देऊ शकते. उत्पन्नात वाढ होऊन नवीन स्रोत उघडतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात सन्मानाने कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)