खूप रागीष्ट असतात या ५ राशींचे लोक, दुसऱ्यांसोबत स्वतःचही करतात नुकसान
तुमची रास तर या पाच राशींपैकी एक तर नाही
मुंबई : ज्योतिष शास्त्रात १२ राशींचं वेगळं महत्व आहे. या आधारावर अनेक व्यक्तींबाबत काही गोष्टी जाणून घेऊ शकतो. जसं की, कोणत्या राशीच्या व्यक्तीला जास्त राग येतो. किंवा कोणत्या राशीच्या व्यक्तीला आरामात काम करणं पसंत आहे. याप्रमाणे राशीच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव त्याची व्यवहाराची पद्धत, आवडी निवडी ओळखू शकतो. आज आपण त्या राशींच्या लोकांबाबत जाणून घेणार आहोत.
मेष - मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. जो आक्रमकता वाढवतो. यामुळे या राशीचे लोक खूप रागावतात आणि त्यांना लवकर राग येतो. लहानसहान गोष्टींना वाईट समजून ते कोणावरही रागावतात. या लोकांना शांत करणे देखील खूप कठीण आहे.
वृषभ - वृषभ राशीच्या नावावरून हे स्पष्ट होते की ते बैलासारखे कष्टाळू असतात पण राग काढतात. राग काढल्यानंतर ते शांत झाले असले तरी तोपर्यंत त्यांचे बरेच नुकसान झाले आहे. या राशीच्या लोकांसमोर चुकीचे बोलणे त्रासदायक ठरते, कारण त्यांना चुकीचे बोलणे सहन होत नाही आणि राग येतो.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना राग लवकर येत नसला तरी तो ज्वालामुखीसारखा असतो. एकदा का हे लोक भडकले की त्यांना शांत करणे फार कठीण होऊन बसते. मात्र, नंतर त्यांनाही त्यांच्या वृत्तीचा पश्चाताप होतो.
सिंह - सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. हे लोक खूप उत्साही असतात आणि चटकन रागावतात. रागाने वेडे होण्यासारखी गोष्ट या लोकांना जमते. रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात आणि इतरांचे मोठे नुकसान करतात.
वृश्चिक - वृश्चिक राशीचे लोक सुद्धा खूप चिडलेले असतात. त्यांच्या इज्जतीचा विषय निघाला तर ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि रागावतात. एवढेच नाही तर बदला घेण्यातही हे लोक श्रेष्ठ असतात. मात्र, त्याचा हा स्वभाव त्याला खूप त्रास देतो.