मुंबई : जगभरात बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली असे सांगितले जाते. बुद्धाचा जन्म  इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला. हे ठिकाण आज एक पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पण, या ठिकाणांप्रमाणेच जगभरात अनेक लोकप्रिय आणि तितकीच प्राचीन मंदिरे आहेत. ज्याची इतर मंदिरांपेक्षा वेगळी अशी खासियत आहे. यापैकी काही मंदिरांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 


महाबोधी मंदिर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील बौद्ध गया येथेल असलेले हे मंदिर अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच मंदिरातील झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. या मंदिराला ऐतिहासिक वारसा असून, त्याच्या बांधणीत वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात.


रामाभर स्तूप


या मंदिरात गौतम बुद्धांचे अंतिम संस्कार करण्यात आले. दुरून पाहिल्यावर एखाद्या दगडाप्रमाणे वाटणाऱ्या या मंदिराची उंची ४९ फुट आहे. मंदिराची रचना पर्यटकांना आकर्षित करते.


चीन, लोशान बुद्ध


चीनच्या नदी काठावर असलेली ही एक जगप्रसिद्ध आणि तितकीच विलोभनीय मूर्ती आहे. सांगितले जाते की, ही मुर्ती तयार करायला ९० वर्षांचा कालावधी लागला. मुर्तीच्या खांद्याची रूंदीच २८ मिटर आणि २३३ फूट आहे. ही प्रतिमा पहायाल जगभरातून पर्यटक येतात.


हाँकाँग, पो लिन मोनेस्ट्री


हा एक बौद्ध मठ आहे. त्याचा शोध १९०६ मध्ये ३ भूक्षुकांनी लावला. हा शोध लागण्यापूर्वी हे ठिकाण बिग हट नावाने ओळखले जात. जगभरातील पर्यटकही हे ठिकाण पाहण्यासाठी गर्दी करतात.


द वाट थाई मंदिर


भारतात असलेल्या वेगळया मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे असे हे बुद्ध मंदिर आहे. भव्यता आणि सुंदरता हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.