मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचे नक्षत्र आणि राशी पाहून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या राशीवरुन त्याचा स्वभावच काय तर त्याचं आयुष्य आणि बऱ्याच गोष्टीची माहिती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला समजते. त्यामुळे जर कोणत्याही व्यक्तीबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तर बरेच लोकं ज्योतिषशाकडे जाता. ज्योतिष त्या व्यक्तीच्या राशीवरुन संपूर्ण माहिती आपल्याला देतो. येथे ज्योतिषशास्त्रानुसार आम्ही अशा 4 राशींबद्दल सांगणार आहोत, जे आपली चूक सहजासहजी मान्य करत नाहीत. चला तर मग आपण या राशींबद्दल जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : मेष राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात, पण त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान असतो. ते जे काही करत आहेत किंवा बोलत आहेत तेच खरे आहे असे त्यांना वाटते. त्यांना इतरांनी त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करणे किंवा विरोध करणे आवडत नाही. ते आपली चूक कधीच सहज स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत ते वाद घालतील, समोरच्यावरती रागावतात मात्र ते प्रत्येक परिस्थितीत स्वतःला योग्य सिद्ध करत राहतात.


सिंह : सिंह राशीच्या लोकांना कोणाच्याही हाताखाली राहणे किंवा त्यांच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. या लोकांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीने करायला आवडते. जर कोणी त्यांचा मुद्दा कापला किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही तर ते त्यांच्याशी वाद घालू लागतात. कोणी जर त्यांच्यावर आरोप केले तर ते देखील त्यांना सहन होत नाही.


तूळ : तूळ राशीचे लोक मनाने स्वच्छ असतात. ते इतरांचा चांगला विचार करतात. पण राग आल्यावर ते काहीही बोलू शकतात. त्यांना राग आला की ते असे काही शब्द बोलतात जे ऐकूण समोरच्या व्यक्तीला राग येईल. ते त्यावेळी कोणाचेही ऐकत नाहीत, तसेच यावेळी त्यांना कोणी समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासोबत वाद घालतात. परंतु शांत झाल्यावर ते त्यांच्या मनात ही चूक मान्य करतात, परंतु समोरच्याला ते कधीही उघड करत नाहीत किंवा त्यांच्या चुकीबद्दल माफीही मागत नाहीत.


कुंभ : कुंभ राशीचे लोक जीवनात खूप संघर्ष करतात आणि त्यांच्या संघर्षाच्या जोरावर ते खूप काही साध्य करतात. म्हणूनच त्यांना असे वाटते की त्यांच्याकडे भरपूर अनुभव असल्याने ते काही चुकीचे करू शकत नाहीत. त्यांना टाळ्या ऐकण्याची सवय आहे. त्यांना कोणी विरोध केला तर ते लढायला तयार राहतात. तथापि, राग शांत झाल्यानंतर, ते स्वतःच संपूर्ण परिस्थितीचे मूल्यांकन करतात आणि योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेतात.