Astrology in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली स्थितीबद्दल असतात. एका राशीत अशा वेळी अनेक ग्रहांचा संयोग होत असतो. लवकरच वृषभ राशीत 100 वर्षांनी ग्रहांचा राजा सूर्य, संपत्तीचा कारक शुक्र, ग्रहांचा देव गुरु यांचं मिलन होणार आहे. या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम 12 ही राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हा योग सकारात्मक तर काहींसाठी नकरात्मक ठरणार आहे. वृषभ राशीतील त्रिग्रही योग काही राशींच्या आयुष्यात कुबेरचा खजिनासह करिअर आणि व्यवसायात प्रगती घेऊन येणार आहे. (Tirgrahi Yog Union of Sun Venus and Jupiter after almost 100 years Kubera treasure will be fit for these zodiac signs)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीत्या चढत्या घरात सूर्य, शुक्र आणि गुरूचा संयोग झाल्यामुळे या राशीच्या लोकांना तो लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. तर अनेक नवीन प्रकल्प तुम्हाला मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसह गती मिळणार आहे. तर व्यावसायिकांना नवीन करार करण्याची संधी लाभणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन सुधारणार आहे. जोडीदाराचीही प्रगतीमुळे तुम्ही प्रसन्न असणार आहात. अविवाहित लोकांना लग्नाचं प्रस्ताव येणार आहे. 


सिंह रास (Leo Zodiac) 


या राशीच्या दहाव्या भावात त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. नोकरीत नव्य नवीन संधी मिळणार आहे. अगदी तुमच्या आवडीची नवीन नोकरीची ऑफरही तुम्हाला येऊ शकते. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळणार आहे. वडिलांकडून सहकार्य लाभल्यामुळे तुम्ही प्रसन्न असणार आहात. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळणार आहे. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


त्रिग्रही योग तुमच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात निर्माण झाल्यामुळे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. या त्रिग्रही योगामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. एवढंच नाही तर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाले आहेत. धार्मिक किंवा समाजिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होणार आहात. एक छोटा किंवा मोठा प्रवासाच शुभ योग निर्माण होणार आहे. आर्थिक सुबत्ता आणि बचतही करणात तुम्ही यशस्वी होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)