मेष - स्वतःच्या समस्येकरता तुम्हालाच सज्ज व्हावं लागणार आहे. दोघांमध्ये तुमची अडचण होऊ शकतो. दिवस ताण तणावात जाईल. पण एकीकडे कुटुंबाकडून आनंदवार्ता तुमच्या कानी पडेल. आरोग्य उत्तम राहिल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - समोरची व्यक्ती काय बोलतेय ते जाणून घ्या. आज स्वतःचे विचार चांगले ठेवा. तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल. कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची थोडी कुरकूर जाणवेल. 


मिथुन - समोरच्या व्यक्तीचा विचार करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. नवीन गोष्ट शिकण्याकडे आजचा कल असेल. कामाचा ताण जाणवेल पण आनंदाच काम असल्यास ती गोष्ट चालवून न्याल. मित्र-परिवारासोबत आनंदाचा क्षण घालवाल. प्रियजनांच्या गाठीभेटी 


कर्क - आजचा दिवस तुम्हाला चहूबाजूंनी आनंद देणारा आहे. कुटुंबासोबत खूप चांगला वेळ घालवाल. तसेच पैशाची रखडलेली सर्व काम सुरळीत होतील. जुनी देणी परत मिळतील. कामाकडे थोडं अधिक लक्ष द्या. 


सिंह - कामात लक्ष द्या. कामात आनंद शोधाल. कुटुंबाकडून सपोर्ट मिळेल त्यामुळे कामात भरघोस यश मिळेल. नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक कराल. पण या दिवसात अतिघाई करू नका ती त्रासदायक ठरेल. 


कन्या - राजकारणापासून दूर राहणंच पसंत करा. आजचा दिवस तुमचा आहे. ज्यागोष्टीत प्रयत्न कराल तेथे यश मिळेल. त्यामुळे मेहनत हा एकच उत्तम मार्ग आहे. कामात भरघोस यश मिळेल म्हणून प्रयत्नात राहा. आनंदवार्ता ऐकू येईल. 


तूळ - आज कामात थोंडा गोंधळ जाणवेल. संपूर्ण दिवस हा गैरसमजीचा असेल. पण तरीही सगळ्या बिझी शेड्युलमध्ये आज एक अशी बातमी कानावर येईल ज्यामुळे संपूर्ण ताण कमी होईल. 


वृश्चिक - आज काही गोष्टी अशा घडतील ज्याचं खापर तुमच्यावर पडेल. पण शांत राहा काही गोष्टी सय्यमानेच घ्या. कारण अनेकदा आपली चूक नसताना आपण त्यामध्ये गोवले जातो. पण आज एक आनंदवार्ता कानी येऊन तुमचा मूड बदलेल. 


धनू - आज जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाण्याची शक्यता आहे. तुमची एक चांगली व्यक्ती आहात. त्यामुळे सय्यमाने गोष्टी करा. वेळ जाऊ देणं हाच सगळ्या प्रश्नांवर उत्तम मार्ग आहे.


मकर - आज जवळच्या मित्रामुळे संकटात सापडाल. संपूर्ण दिवस कंटाळवाणा असेल. गोष्टी टाळूनही तुम्ही त्यामध्ये अडकले जाणार. त्यामुळे आजचा दिवस एकांतात घालवण महत्वाच ठरणार आहे. 


कुंभ - तुमचं मत महत्वाचं असेल. त्यामुळे काही महत्वाचे निर्णय हे तुम्हाला विचारूनच घेतले जातील. यासाठी तयार राहा. आरोग्य उत्तम राहिल. मुलांसोबत वेळ घालवाल. 


मीन - कधी कधी काही गोष्टी दुरूनच करण उत्तम आहे. जवळच्या व्यक्तीसोबत वाद होईल त्यामुळे शांत राहा. कामात स्वतःचे 100 टक्के द्या ते सर्वात जास्त महत्वाचे असणार आहेत.