Ganadhipa Sankashti Chaturthi Vrat: आज गणाधिप संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणतात. या महिन्यात येणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व देण्यात येत. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून पूर्ण विधीवत पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणाधिप संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. कारण आज दुपारी 03:01 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. तर उद्या म्हणजेच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 06:56 पर्यंत असणार आहे. गुरुवारी म्हणजेच आज सकाळी 08:15 ते रात्री 08:15 पर्यंत शुभ योग आहे, तर शुक्रवारी रात्री 08:15 ते रात्री 08:04 पर्यंत शुक्ल योग आहे.


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि गणपतीची पूजा करण्याबरोबरच चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. हे खास व्रत पाळणारे लोक चंद्राला अर्घ्य देऊनच आपले व्रत पूर्ण करतात. गणाधिप संकष्टी चतुर्थीची उपासना करण्याचा शुभ मुहूर्त केव्हा आहे आणि पूजा कशी करावी याची माहिती घेऊया.


पूजेच्या मुहूर्ताची वेळ


ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी २:२४ वाजता सुरू होणार आहे. उदयतिथीच्या आधारे गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत 30 नोव्हेंबरला पाळण्यात येणार आहे. सकाळी गणाधिप संकष्टी चतुर्थीची पूजा होईल. 


आजचा शुभ मुहूर्त सकाळी 06:55 ते 08:14 पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त दुपारी 12:10 ते 01:28 पर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 01:28 ते 02:47 पर्यंत असणार आहे. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या रात्री 07:54 वाजता चंद्रोदय होणार आहे. 


गणाधिप संकष्टी चुतुर्थीची पूजा कशी करावी?


गणाधिप संकष्टी चतुर्थीची पूजा करण्यासाठी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून दैनंदिन काम उरकून घ्यावी. यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून श्रीगणेशाची पूजा व व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्या. नंतर स्टूलवर लाल किंवा पिवळे कापड पसरवा आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. 


गणपतीच्या मूर्तीवर अक्षता, कुंकु, दुर्वा, रोळी, अत्तर, सुका मेवा आणि मिठाई अर्पण करा. शेवटी श्रीगणेशाची आरती करावी. आरतीनंतर त्याचा आवडता मोदक गणपतीला नैवेद्या म्हणून दाखवा. रात्री चंद्र उगवताच अर्घ्य देऊन व्रत पूर्ण करा. अशा प्रकारे तुमचे व्रत पूर्ण होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )