मेष- एखाद्या गोष्टीची अपेक्षा असल्यास आज ती गोष्ट सहजपणे तुमच्यापर्यंत येणार आहे. पण, या संघीचा दुरुपयोग करु नका. स्वत:ची वाट शोधण्यासाठीच या संधीचा वापर करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- आज कोणा इतरांसाठी नव्हे, तर स्वत:साठी प्रेरणास्थानी या. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला नशिबाची साथ मिळत आहे. आजही ती मिळेल. समस्यांवर तोडगा काढा आणि त्या मार्गी लावा. अडचणींवर मात करता येण्याची तुमची क्षमता आज इतरांसाठी फायद्याची ठरेल. 


मिथुन- योग्य निर्णय घेण्याच्या दिशेने आज वाटचाल कराल. एकादा मोठा निर्णय घेण्याची संधी मिळेल. सावधगिरी बाळगा. कोणाला मदतीची गरज वाटल्यास त्यांची मदत करा. 


कर्क- सर्व निर्णय़ आपल्या बळावर घेतल्याची समाधानाची भावना आजचा दिवस आनंदी करणार आहे. तुम्ही खुप काही करु शकता. पण, आजच्या या क्षणी .काही ठराविक गोष्टींवरल केंद्रीत राहा. 


सिंह- तुमच्या मनात खुप गोष्टींनी घर केलेलं आहे. सध्या तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत आहात त्या व्यक्तीचा प्रवेश जीवनात अखेर होणार आहे. अनपेक्षित घटनांसाठी तयार राहा. जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा. 


कन्या- कोणतीही माहिती तुमच्यापर्यंतच न ठेवता ती इतरांपर्यंत पोहोचवा. आज निर्णय स्वत: घेण्यापूर्वी त्याविषयी इतरांशी चर्चा जरुर करा. 


तुळ- आज बहुतांश बाबतीत चिंतामुक्त व्हाल. बऱ्याच कालावधीनंतर आवडीच्या व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. नवे विचार जीवन व्यापतीस. सुखाची अनुभूती देतील. 


वृश्चिक- वयाने लहानांचे सल्लेही आज फायद्याचे ठरणार आहेत. समस्यांवर अगदी सहज मार्ग निघेल. नव्या विश्वात प्रवेश करण्यात तयार राहा. 


धनु- आज कोणतंही संकट स्वीकारण्यापूर्वी विचार करा. नव्या संकटांसाठी आजचा दिवस चांगला नाही. आश्चर्यचकित होण्यापेक्षा प्रसंगांविषयी विचार करण्याचा प्रयत्न करा. 


 


मकर- आज इतरांना समजून घेण्यात काही अंशी अडचणी येतील. त्यामुळे अर्थातच मतभेदही वाढतील. पण, संयम ठेवा हा काळही निघून जाईल. 


कुंभ- आज विरोधी पक्षापासून सावध राहा. आज खऱ्या मित्रांची मदत होणार आहे. इतरांनाही तुमची चिंता आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. 


मीन- आजूबाजूच्या परिस्थितीमुळे चिंतातूर होऊ नका. इतरांप्रती आदराची भावना ठेवा. आजचा दिवस शुभ असेल.