मेष- नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मदत मिळणार आहे. आज फार काम करावं लागणार आहे. पण, घाबरुन जाऊ नका. नवं घर खरेदी करण्याची इच्छा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- व्यापार बेताचाच असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे. कर्ज फेडण्याची संधी आहे. वडिलांची मदत मिळेल. 


मिथुन- काही बाबतीत दुमत असल्यामुळं कामात मन रमणार नाही. एखादी चिंता सतावेल. एकाग्रता कमी असेल. पोटाच्या विकारांपासून दूर राहा. 


कन्या- नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधण्याचा योग आहे. व्यापारामध्ये धनलाभ होणार आहे. महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 


तुळ- आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागू शकतो. संधी मिळाली तर आराम करा. 


वृश्चिक- अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल. एखाद्या आवडत्या व्यक्तीशी भेट घडेल. 


धनु- व्यापारात फायदा होणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळणार आहे. खर्च वाढतील. 


मकर- व्यापारासाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. नवी जबाबदारी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल.


कुंभ- नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. कामासाठीच्या मुलाखती यशस्वी ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन- कामाच्या पद्धतींमध्ये थोडे बदल घडून येतील. एखादं मवं काम हाती येईल. जबाबदारी वाढेल. दिवस चांगला आहे.