Panchang 5 February 2023 : काय सांगतं आजचं पंचांग?, कोणत्या आहेत शुभ-अशुभ वेळ?
Panchang Today 5 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Today Panchang, 5 February 2023: हिंदू पंचांगाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. आजचा वार रविवार असून माघ महिन्याची पौर्णिमा आहे. ज्याला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाचे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात. आजच्या शुभ आणि अशुभ काळाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
आजचा वार: रविवार
पौर्णिमा : रात्री 11:58 वाजेपर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्तच्या वेळा
सूर्योदय : सकाळी 07:07
सूर्यास्त : संध्याकाळी 06:03
चंद्रोदय : संध्याकाळी 05:40
चंद्रास्त : चंद्रास्त नाही
आजचा शुभ मुहूर्त
अभिजित मुहूर्त : दुपारी 12:13 ते दुपारी 12:57 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:25 ते दुपारी 03:08 वाजेपर्यंत
आजचे अशुभ मुहूर्त
दुर्मुहूर्त : दुपारी 04:36 ते संध्याकाळी 05:20 वाजेपर्यंत
राहुकाल : दुपारी 04:41 ते संध्याकाळी 06:03 वाजेपर्यंत
गुलिक काळ : दुपारी 03:19 ते दुपारी 04:41 वाजेपर्यंत
यमगण्ड : दुपारी 12:35 ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)