मुंबई : आजचा दिवस सकारात्मकता आणि बराच आनंद घेऊन तुमच्या आयुष्यात आला आहे. पाहा काय सांगतंय आजचं राशीभविष्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - आज नव्या नोकरीचं ऑफर लेटर मिळू शकतं. कामं अतिशय सहज पद्धतीनं मार्गी लागतील. अडकलेल्या कामाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. 


वृषभ- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. एखाद्या गोष्टीमध्ये तडजोड करावी लागली तर मागे हटू नका. धैर्यानं पुढे जा. 


मिथुन- आज तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा मोठा फायदा होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष घ्या. 


कर्क- व्यवसायात यश मिळणार आहे.  धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. आज आर्थिक पाठबळ मिळणार. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


सिंह- मानसिक ताण असेल. तरुणांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराची काळजी घ्या. 


कन्या- बोलण्यावर ताबा ठेवा. कोणत्याही विषयाकडे , किंबहुना गंभीर वातावरणावर जास्त लक्ष देऊ नका. मनाजोगं आयुष्य जगा. 


तुळ- जुन्या चुकांमधून शिका. आज विवाहितांसाठी आनंदाचा दिवस आहे. एखादी भेटवस्तू मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक - एखाद्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. महिलांना काही आरोग्याचे त्रास सतावू शकतात. चिंता करु नका. 


धनु- उपजिवीकेसाठी नवं साधन मिळणार आहे. आज तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 


मकर - उगाच लांबच्या प्रवासाला निघू नका. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांशी संबंधित निर्णय सतर्कतेनं घ्या. 


कुंभ- कामात सतर्क राहा. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल. एखादा प्रवास करण्याची संधी मिळेल. कुटुंबाला वेळ द्या. 


मीन - युवा वर्गानं त्यांच्यासोबत असणाऱ्यांवर लक्ष द्यावं. कुटुंबातील अनेक व्यक्ती आज एकत्र येणार आहेत. मोठा जल्लोष होण्याची संधी आहे.