मेष : आज नोकरीमध्ये प्रमोशनची शक्यता आहे, पण कमाई कमी होण्याचा योगही आहे. प्रपोज करण्यासाठी चांगली वेळ आहे, पण विचार करून निर्णय घ्या. जुनी दु:ख त्रास देऊ शकतात. ऑफिसमधले काही सहकारी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतील. बचत आणि गुंतवणूक होऊ शकेल. काही ठरवलेली कामं पूर्ण करायला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : कोणतीही गुंतवणूक विचार करून करा. पैशांची देवाण-घेवाण आणि गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. वृषभ राशीच्या लोकांचं लक्ष आज कामकाजात लागणार नाही. तुम्ही गुपित ठेवलेल्या गोष्टीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दिवसभर सावध राहून काम करावं लागेल. शनी-चंद्रामुळे तुमची बचत खर्च होऊ शकते. घाईमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे तुमचं काम अडचणीत येण्याची संभावना आहे. दुखापत होऊ शकते. वाहन सावकाश चालवा.


मिथुन : देवाण-घेवाण करताना सावध राहा. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. तुमच्यासाठी महत्त्वपू्र्ण असलेलं यश मिळवण्याची शक्यता नाही. जुने आजार उलटू शकतात. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. रोजच्या कामांमध्ये कोणाची मदत मिळणार नाही. तडकाफडकी घेतलेला निर्णय अडचणीत टाकू शकतो. नुकसान होण्याचीही शक्यता आहे. ऑफिसमधील अडचणीही वाढू शकतात.


कर्क : विचार केलेली कामं पूर्ण न झाल्यामुळे दु:खी व्हाल. धन हानीचा योग आहे. दिवस तणाव आणि धावपळीचा असेल. जास्त काम कराल पण फायदा मिळणार नाही. आज तुमचा निष्काळजीपणाही समोर येऊ शकतो. कुटुंबातल्या मोठ्या सदस्याची तब्येत बिघडू शकते.


सिंह : कामकाजात यश मिळेल. सौद्यांमध्ये फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनाही धन लाभ होऊ शकतो. कामात मेहनतही करावी लागेल. जे पाहिजे ते मिळाल्यामुळे प्रसन्नता वाढेल. दाम्पत्यांच्या जीवनात सुख येईल. चांगली बातमी ऐकायला येऊ शकते. प्रयत्न केले तर केलेल्या प्रत्येक कामात फायदा होईल.


कन्या : जास्त मेहनत करावी लागेल आणि त्याचा फायदाही मिळेल. उद्योग धंद्यामध्ये चांगल्या लाभाची शक्यता आहे. नोकरदारांसाठीही चांगला काळ आहे. जुनी टेन्शन संपू शकतात. जुनी कामं संपवण्याचाही विचार करू शकता. जोडीदाराबरोबर फिरायलाही जाऊ शकाल. तुमचा मूड रोमॅण्टिक राहिल.


तूळ : गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरदारांनी कामकाज टाळू नये. तसंच काही जणांची मदतही मिळू शकते. धन आणि कुटुंबाच्या सहयोगामुळे मन प्रसन्न राहिल. शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रगतीसाठी पुरेपुर प्रयत्न जरूर करा. साथीदाराच्या भावनांचा सन्मान करा. तब्येतीसाठी दिवस चांगला आहे.


वृश्चिक : व्यवसायात टेन्शन वाढू शकतं, त्यामुळे थोडे सावध राहा. तब्येतीची हेळसांड करून नका. जुने आजार डोकं वर काढू शकतात. हात-पाय आणि अंगदुखी व्हायची शक्यता आहे. नुकसान झाल्याची बातमी मिळू शकते. कोणत्याही गोष्टीला आज विरोध केलात तर स्वत: दु:खी व्हाल, सावध राहा. कोणतंही नवीन काम सुरु करु नका.


धनू : स्थावर मालमत्तेमुळे फायदा व्हायचा योग आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. लव लाईफसाठीही चांगला काळ आहे. साथीदारासोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरणही चांगलं राहिल. नोकरी आणि व्यवसायातील जरुरी कामं पूर्ण व्हायची शक्यता आहे. संपत्तीच्याबाबतीत फायदा व्हायची शक्यता आहे. खास निर्णय विचार करून घ्या. कामाचं कौतुक होईल.


मकर : बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. व्यापारात लाभ होईल. थांबलेली कामं पूर्ण व्हायची शक्यता आहे. काम आणि मेहनत करून टीकाकारांना योग्य उत्तर द्याल. जुनं कर्ज बाकी असेल तर ते फेडाल. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामावर खुश होईल. पती-पत्नीचे संबंध मजबूत राहतील. तुमच्या कामाबद्दलची नवी गोष्ट आज समजू शकते. मोसमी आजारांमुळे त्रास होऊ शकेल त्यामुळे काळजी घ्या.


कुंभ : नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. तसंच सहकारी कामामध्ये मदत करतील. जुन्या योजना पूर्ण होण्याचा फायदा मिळू शकेल. नवीन काम आज करू शकाल. नवीन लोकांची मदत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे धन लाभाचा योग आहे. आजचा दिवस लव्ह लाईफसाठी चांगला आहे. जुनी लोकं त्रास देऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.


मीन : व्यवसायात मोठे निर्णय घेणार असाल तर सावध राहा. नुकसान व्हायची शक्यता आहे. आज कामही टळू शकतं. खास कामाबद्दल संभ्रम राहिल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये जुनी चूक किंवा कामाबद्दल मनात भीती राहू शकते. खर्च वाढण्याचा योग आहे. प्लानिंग फेल व्हायची शक्यता आहे.