आजचे राशीभविष्य | सोमवार | १२ ऑगस्ट २०१९
जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस
मेष- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत. आत्मविश्वासाच्या बळावर अडचणींच्या कामांमध्येही यश मिळेल. पैसे आणि व्यापारावर भर द्या. समाजात सन्मान वाढेल. खर्चही वाढेल.
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी आज जास्त काम करावं लागू शकतं. इतरांकडून काम करुन घ्याल. सावध राहा. मानसिक तणावामुळे कामावर कमी लक्ष ठेवाल. अडचणींचा सामना करावा लागेल. जास्त विचार करु नका.
मिथुन- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीक कुटुंबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वकपणे बोला. प्रगतीची संधी मिळेल. घरात गरजेच्या वस्तू खरेदी कराल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. विश्वसनीय व्यक्तीची साथ मिळेल. भावनांचा आदर करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क- नव्या व्यापारांच्या दिशेने आकर्षित व्हाल. नोकरीत मोठे आणि महत्त्वाचे बदल होतील. अर्थार्जनाची संधी मिळेल. व्यवहारकौशल्याच्या बळावर वरिष्ठांकडून आदर मिळेल. आरोग्यत सुधारणा राखा. जुने आजार दूर होतील.
सिंह- व्यापाराचे नवे बेत आखाल. अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्याकडून कर्ज घ्यावं लागेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या निमित्ताने एखादा प्रवासयोग आहे. तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कन्या- नोकरी आणि व्यवसायामध्ये भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही वादांमध्ये अडकू नका. एखादा जुना वाद समोर येऊ शकतो. कुटुंबात असणाऱ्या समस्या कायम राहतील. मानसिक तणाव वाढेल. वाहनांचा सावधगिरीने वापर करा.
तुळ- कर्जापासून मुक्ती मिळेल. स्वत:च्या कामावर लक्ष ठेवा. अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमचा व्यवहार इतरांना आनंद देईल. काही नवं आणि सकारात्मक काम तुमच्याकडून होईल. जीनशैलीत चांगला व्यवहार येईल.
वृश्चिक- व्यापार चांगला असेल. तुमचं एखादं चांगलं कां पूर्ण होईल. व्यक्तीगत वाद मिटतील. जमीनीच्या व्यवहाराच्या बाबतीत लक्ष द्या. गुंतवणूकीच्या योजना आखाल. आजचा दिवस आरामात जाणार आहे.
धनु- नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची संधी आहे. स्वत:चा व्यवसाय असेल तर त्यावर पूर्ण लक्ष ठेवा. व्यवसाय आणि नोकरीमध्ये अडचणी दूर होतील. वायफळ पळापळ संपेलच. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तणाव होईल.
मकर- आर्थिक अडचणी सुधारतील. नव्या माहितीचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ- व्यवसायात आत्मनिर्भर असाल. नव्या व्यक्तींशी संपर्कात याल. कामाचा व्याप वाढेल. साथीदारांचं सहकार्य लाभेल. नव्या व्यक्तींशी संबंध आणखी दृढ होतील. जुन्या वादांवर तोडगा निघेल.
मीन- आज तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. काही लहानसहान अडचणी असतील. अर्थार्जनाच्या अनुशंगानेच खर्च करा. अतिउत्साहात येऊन नवी गुंतवणूक कराल. कामाच्या बाबतीत व्याप वाढेल.