मेष- अतिशय संवेदनशीलपणे वागाल. वायफळ कामांकडे दुर्लक्ष करत काही महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असाल. विचारांमध्ये काही महत्त्वाचे बदल घडतील. अर्थार्जनाची नवी संधी मिळेल. आर्थिक समस्यांवर तोडगा निघेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. साथीदारासोबत आरोग्याची साथ असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- केलेल्या सर्व कामांची पुन्हा एकदा पडताळणी करा. तणाव कमी असेल. गुंतवणूकीच्या काही नव्या संधी समोर येतील. काम पुढे नेण्याचा विचार कराल. बऱ्याच अंशी कामांमध्ये यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. पती- पत्नीचं नातं आणखी दृढ होईल. 


मिथुन- ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्या आजच्या दिवशी नियंत्रणात येतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. नोकरी आणि व्यापारामध्ये यश मिळेल. काही नव्या जबाबदाऱ्या मिळतील. 


कर्क- मित्र किंवा नातेवाईकांना तुमची कमतरता जाणवेल. काही वेळेस चांगल्या भेटीगाठी आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही खास नाती आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण होतील. 


सिंह- एखाद्या मोठ्या योजनेवर काम करण्याचा बेत आखू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवी जबाबदारी मिळेल. जी जबाबदारी पार पाडाल तर तुम्हाला फायदाच होणार आहे. एखाद्या अशा व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज एखाद्या नव्या व्यवसायाची रुपरेषा आखाल. साथीदाराचं सहकार्य मिळेल. 


कन्या- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अर्थार्जनात वाढ होईल. कर्ज फेडण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत विचारसरणी बदलेल. प्रयत्न कराल तर, परिस्थिती सुधारू शकते. मेहनत करा. जास्तीची कामं फायद्याची ठरतील. इतरांशी संवाद साधणं तुम्हाला फायद्याचं ठरेल. 


तुळ- एखादं मोठं काम तुम्हाला एकट्यालाच करावं लागेल. कामाच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळू शकते. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करा. आर्थिक गोष्टींचा ताण कमी होईल. नव्या कामाची सुरुवात कराल. दिवस चांगला आहे. 


वृश्चिक- सोबतच्या काही व्यक्तींसाठी तुम्ही मदतीचे ठराल. ज्यांच्याकडून अपेक्षाही नाही, अशा व्यक्तींचीही मदत मिळेल. आर्थिक अडचणी सुधारण्याचा प्रयत्न कराल. व्यापाराच्या निमित्ताने एखादा प्रवास करावा लागू शकतो. 


धनु- संबंध सुधारतील. अतरांचा मान राखा. निर्णय विरारपूर्णपणे केलेले असतील. व्यापार आणि नोकरीत यशस्वी व्हाल. विवहप्रस्ताव मिळतील. प्रेमाच्या नात्यामध्ये असणारी तेढ सुटेल. एखाद मोठा निर्णय घ्यायचा झाल्यास साथीदारांचा सल्ला घ्या. 


मकर- नोकरी किंवा व्यापारासंबंधी एखादा नवा बेत आखाल. इतरांच्या भावना सोप्या पद्धतीने समजू शकाल. आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळेल. एखादी चांगली बातमी कळेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. 


कुंभ- नशीबाची साथ मिळेल. कमी मेहनतीतही जास्त फायदा मिळेल. काही अंशी दिवस चांगला असेल. वरिष्ठांवर तुमचा प्रभाव असेल. एखाद्या व्यक्तीकडून उपयोगाचा सल्ला मिळेल. ज्या पद्धतीने इतरांशी संवाद साधाल ते पाहता तुमचा इतरांवर सहज प्रभाव पडेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल. 


मीन- कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अनेक गोष्टी सामान्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील असाल. कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा ठेवा. नवं घर किंवा वाहनाच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो.