मेष- काही कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरी बदलण्याचा विचार कराल. विचापूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही कामात घाई करु नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत दूरच्या एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नतीची संधी आहे. सोबत काम करणाऱ्यांचं सहकार्य मिळेल. साथीदाराचंही सहकार्य मिळेल. काम करण्याच्या पद्धतींमध्ये काही महत्त्वाचे बदल घडतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. 


मिथुन- ग्रहनक्षत्रांची परिस्थिती चांगली आहे. आज तुम्ही बऱ्यापैकी सक्रिय असाल. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी जबाबदारी मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल. 


कर्क- नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काही व्यक्तींवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. प्रेमाच्या नात्यात साथीदारामुळे आर्थिक फायदा मिळेल. भावनात्मक आधार मिळेल. सामाजिक कामांसाठी काही व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. अपघात होण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा, काळजी घ्या. 


सिंह- अधिकाऱ्यांचा सहयोग मिळू शकतो. व्यापारामध्ये सावधगिरी बाळगा. नोकरी किंवा व्यापारामध्ये जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. साधीदारासोबत एखाद्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. 


कन्या- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. किंवा मोठे बेत आखू शकता. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. न मागताच कोणाला तरी सल्ला द्याल. आरोग्याच्या समस्या दूर जातील. 


तुळ- अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यापारामध्ये सहकार्य न मिळाल्यामुळे काही अडचणी निर्माण होतील. येत्या काही दिवासांमध्ये मोठी कामं हाती घेऊ शकता. साथीदाराची साथ आणि पाठिंबा मिळेल. विवाहप्रस्ताव मिळू शकतात. 


वृश्चिक- व्यापारामध्ये फायदा होऊ शकतो.  नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या अडचणी दूर होतील. शत्रूवर मात करु शकता. काही जबाबदाऱ्या पूर्ण होतील. एखादा मोठा फायदा होईल. बाहेर जाण्याचे बेत आखाल. साथीदाराची मदत होईल. आरोग्याची काळजी घ्या. 


धनु- नोकरदार वर्गाच्या कामात अडचणी येतील. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगा. कायदेशीर कामांमध्ये अडकाल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 


मकर- जुन्या अडचणी दूर होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये काही नव्या कल्पना सुचतील. उत्साह वाढलेला असेल. कोणावरही आंघळा विश्वास ठेवू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ- करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दिवस  चांगला आहे. कामाच्या 
ठिकाणी चांगली मदत मिळेल. काही चांगले बदल घडण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याता योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन- अचानक एखाद्या बाबतीत फायदा मिळू शकतो.साथीदाराचं सहकार्य मिळाल्यास धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनं कर्ज फेडाल. वायफळ खर्चांवर नियंत्रण असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी जबाबदारी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.