मेष- कोणा एका व्यक्तीशी नवं नातं जुळेल. राजकाराशी संबंधितांना एखाद्या मोठ्या पदाचा स्वीकार करावा लागेल. कामात बढती मिळण्याची शत्यता आहे. आजचा दिवस चांगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका, दिवस चांगला आहे. भावनांमध्ये चढ उतार संभवतात. मागच्या काही काळापासून असणाऱ्या अडचणी दूर जातील. एखादी शुभवार्ता मिळेल. 


मिथुन- पैशांच्या बाबतीत तुमची कामं कुठेही अडणार नाहीत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये मेहनतीच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. धीराने काम करा, यशस्वी व्हाल. 


कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या योजनेचा तुम्हालाच फायदा होणार आहे. फायगेशीर व्यक्तींची भेट घडेल. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी पूर्ण विचार करा. 


सिंह- एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं नातं सुधारण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास ठेवा. कोण्त्याही कामात हट्टीपणा करु नका. काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो. 


कन्या- एखादं वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. आज तुम्ही जास्त भावनात्मकपणे विचार कराल. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासयोग संभवतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


तुळ- एखाद्या कामात स्वत: नेतृत्त्व कराल. कामाचा व्याप जास्त असेल. मेहनतही जास्त करावी लागू शकते. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. शुभकार्य़ात सहभागी व्हाल. 


वृश्चिक- कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. कमीत कमी वेळात जास्त कामं आटोपण्यावर भर द्य़ाल. एखादी शुभवार्ता कळेल. व्यापारामध्ये फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये नशीबाची साथ मिळेल. 


धनु- कुटुंबाच्या मदतीने काही खास कामं पूर्ण कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाचा व्याप वाढेल. एकाग्रतेने काम करा. पुढे जाण्यासाठी पर्यायी  मार्गही मिळतील. 


मकर- कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर इतरांचं लक्ष असेल. परिस्थिती तुमच्या पारड्यात आहे. तुमचं म्हणणं स्पष्टपणे सर्वांसमोर ठेवा. 


कुंभ- कामाच्या पद्धतीमुळे इतरांकडून आदर मिळेल. साथीदाराची साथही मिळेल. दैनंदिन कामं वेळेत पूर्ण होतील. इतरांचं सहकार्य मिळेल. 


मीन- कोणत्याही प्रकारचं काम पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नांत असाल तर, त्यात इतरांची मदत होईल. कायदेशीर कामं पूर्ण होतील. कामाप्रती असणारी एकनिष्ठता पाहून वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील.