मेष - तुमच्या मनाचा आवाज आज ऐका. स्वतःबद्दलच काही नवीन गोष्टींचा आज उलगडा होईल. कामात नव्या लक्ष द्याल. आजचा दिवस हा खास असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - भूतकाळ विसरून भविष्याकडे वाटचाल कराल. का झालं? काय झालं? कुणामुळे झालं? यासारख्या प्रश्नांमधून आज बाहेर याल. कामाकडे आणि खासकरून स्वतःकडे लक्ष द्याल. 


मिथुन - आतापर्यंत जीवन बदलत नाही असं वाटत असेल तर आज जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे. सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत कराल. राहून गेलेल्या गोष्टी आजपासून नव्याने करायला घ्याल. 


कर्क - आज तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमची गरज आहे. त्यामुळे स्वतःबरोबरच प्रिय व्यक्तीला देखील सकारात्मक विचारांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. आरोग्य सांभाळा 


सिंह - नोकरदारवर्ग आणि व्यावसायिक आज काही तरी नवीन गोष्ट सुरू करतील. कामाकडे लक्ष द्याल. सकारात्मकता हाच आजचा मंत्र असेल. महिलांसाठी आजचा दिवस खास असेल. जुन्या आणि जवळच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. 


कन्या - कोणत्या गोष्टीबाबत मनात शंका येत असेल तर थोडं थांबा. विचार करा, जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच पुढे जा. आज आरोग्याची काळजी घ्या. पोटाची दुखणी वर डोकं काढतील. 


तूळ - आज आर्थिक बाजू सांभाळा. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. व्यवसायात लक्ष द्या. पार्टनरकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यकडे विशेष लक्ष द्या. जुनी दुखणी पुन्हा बळावतील. 


वृश्चिक - आज काही तरी कमतरता तुम्हाला जाणवेल. गप्प राहणं हा सगळ्यावरच चांगला उपाय आहे. प्रियजनांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शरीराकडे लक्ष द्या. अविवाहितांसाठी आजचा दिवस खास आहे. महत्वाचे निर्णय आज घ्याल. 


धनू - उच्च पदाच्या लोकांसाठी आजचा खास दिवस आहे. जुन्या लोकांच्या गाठीभेटी होतील. कामाकडे थोडं दुर्लक्ष होईल. पण दुपारनंतर पु्न्हा जोमाने कामाला लागाल. 


मकर - कलाकारांसाठी आजचा दिवस खास आहे. रखडलेले पैसे मिळतील. नवीन काम चालून येतील. अबोला धरलेली व्यक्ती पुन्हा बोलू लागेल. वृद्ध आई-वडिलांकडे खास लक्ष द्या. तसेच आरोग्य जपा. 


कुंभ - या राशीच्या लोकांसाठी दिवस खास आहे. कामाकडे लक्ष द्या. व्यावहारिक पद्धतीने कामाकडे बघा. आरोग्याकडे लक्ष द्याल. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. 


मीन - आज मौन पाळा, हेच तुमच्यासाठी योग्य आहे. जवळच्या व्यक्तींसोबत दुरावा निर्माण होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. खरेदीची संधी आहे. मनापासून खरेदी करा.