आजचे राशीभविष्य | मंगळवार | २४ डिसेंबर २०१९
जाणून घ्या काय आहे तुमचं भविष्य
मेष- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. समाजात सन्मान मिळेल. कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील.
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी जास्त काम असेल. काही व्यक्ती तुमच्याकडून काम करुन घेण्याचा प्रय्त्न करतील. सावध रहा. मानसिक ताण असल्यामुळे कामावर कमी लक्ष असेल. जास्त विचार करु नका.
मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. प्रतीपथावर वाटचाल कराल. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क- नव्या व्यापाराकडे आकर्षित व्हाल. नोकरीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतील. मिळकत वाढेल. जुन्या गोष्टी आठवतील. तुमच्या व्यवहारकौशल्याने वरिष्ठ प्रभावित होतील.
सिंह- व्यवसायात काही नव्या घडामोडी घडतील. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहप्रस्ताव येतील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो.
कन्या- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत भावनांच्या आधारे जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वादांमध्ये अडकाल. जुने वाद पुन्हा डोकं वर काढतील. कौटुंबीक समस्या वाढतील. वाहनांचा सावधगिरीने वापर करा.
तुळ- कर्जापासून मुक्त व्हाल. स्वत:च्या कामावर लक्ष ठेवा. काही मित्र आणि नातेवाईक आज जास्त महत्त्वाचे असतील. नवं आणि सकारात्मक काम हाती घ्याल. आयुष्य सुधारु शकेल.
वृश्चिक - व्यवसाय चांगला चालेल. तुमचं एखादं अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम असेल. व्यक्तिगत प्रश्न निकाली निघतील. गुंतवणूकीच्या योजना आखाल.
धनु- नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग आहे. स्वत:च्या व्यवसायावर लक्ष द्या. नोकरीशी निगडीत अडचणी दूर होतील. धावपळ थांबेल. दिवसभर थकवा जाणवू शकतो.
मकर- आर्थिक गुंतागुंत निकाली निघेल. नव्या ओळखीचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मनाजोगी बदली किंवा स्थलांतर मिळेल. जड आहार अडचणीत आणू शकतो.
कुंभ- व्यापारात आत्मनिर्भर असाल. नव्या ओळखी होतील. कामाचा व्याप वाढेल. इतरांचं सहकार्य मिळेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत बदल आणि चांगल्या सुधारणा होतील. विचाराधीन कामं पूर्ण होतील.
मीन- आज बोलण्यावर ताबा ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे थकवा जाणवू शकतो. आत्मविश्वास असावा, पण अतिआत्मविश्वास नको. अतिउत्साहात कोणतीही गुंतवणूक करु नका. कामाचा व्याप वाढेल. आरोग्य सामान्य असेल.