मेष : आर्थिक प्रकरणात समजूतदारीने काम घ्या.जोडीदाराचा सल्ला घेतल्यास फायदा होऊ शकतो. पैसे कमावण्याची योजना बनवाल. नोकरीमध्ये कोणती चांगली संधी मिळू शकते. काही मित्रांशी भेटी होतील. ज्यांच्याशी तुम्ही भविष्यातील काही प्लानिंग कराल. तुमच्या डोक्यात सतत प्लानिंग सुरू राहील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. तुमचा सल्ला घेतल्याने लोकांना फायदा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : चांगली प्लानिंग आणि विचार केल्याने तुम्हाला मोठा फायदा होईल. ठरवलेली खास कामे पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरी किंवा दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. खरेदीमध्ये फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमच्याकडच्या योजनांनी तुम्ही इतरांना प्रभावित कराल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. 


मिथुन : आज तुम्ही नवे प्रयोग कराल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. मनाचा आवाज ऐका. प्रत्येक संबंधात सहजता असेल. लोकांशी तुमचा ताळमेळ राहील. रोमांसचे क्षण मिळतील. परिवार किंवा मित्रांसोबत फिरायला जाल. 


कर्क : आज जर तुम्ही प्रयत्न कराल तर यश नक्की मिळेल. आज तुम्ही जवळजवळ कोणालाही तुमच्या बोलण्याने सहमत करु शकता. घरातील काही प्रकरणे अचानक तुमच्या समोर येतील. थोडा वेळ स्वत: साठी द्या. मदत आणि समजदारी दाखवण्याचा विचार करुनच घराबाहेर पडा. ऑफिस किंवा फिल्डवर कोणत्यातरी कामात तुम्हाला समजदारी दाखवायला लागेल. जे येणाऱ्या दिवसात तुमच्या बाजूने असेल. 


सिंह : आज तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पद्धत वापरून पाहाल. व्यस्त असूनही चांगले पैसै कमवाल. पैशांच्या प्रकरणात फायदा मिळले. नवी नोकरी मिळण्याचे योग आहेत. जास्तीत जास्त लोक तुमच्यासाठी सकारात्मक असतील. परिवारातील लहान मुलांच्या भेटी होतील. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात धन लाभ होण्याचे योग आहेत. पदोन्नती सोबत सन्मानही मिळेल. 


कन्या : ऑफिसमध्ये आज तुम्ही अनेक प्रकरणांत यशस्वी व्हाल. करियरशी संबंधित काही प्रकरणांत समाधान मिळेल. तुम्ही काळजी करु नका. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतूक होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. गिफ्ट मिळू शकते. नव्या मित्रांशी ओळख होईल. व्यवसाय करताना अडकलेला पैसा परत मिळू शकेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. 


तुळ : स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. माहीती गोळा करा. लोकांना भेटा आणि गरज वाटली तर प्रवास देखील करा. आपल्या जीवनात काही बदल होत आहेत. काही नवे अनुभव मिळतील. जुन्या गोष्टी आणि आठवणी विसरण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही खुले मन आणि उत्साहाने सर्वांना समजावून घेत काम कराल. तुमच्या राहणीमानात बदल करण्याचा विचार कराल. 


वृश्चिक : ऑफिसमध्ये कोणती जास्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवे काम सुरू करण्याचे देखील मन बनवू शकता. दुसऱ्यांच्या सांगण्याकडे लक्ष द्या. काम जास्त नसेल तर दिवस लवकर संपेल ऑफिसमध्ये कोणत्या तरी कामात आलेली अडचण संपून जाईल. तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतील अशा व्यक्तींशी तुमची ओळख होईल. पैंशांशी जोडलेली प्रकरणे संपवून टाका. 


धनु : जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणती मोठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. पैसे गुंतवण्याच्या बाबतीतल लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. कोणती संधी जाऊ देऊ नका. काही नवीन आणि मजेदार लोकांशी भेटीगाठी होतील. आज तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही बदल करण्याचा विचार कराल.


मकर : खूप धैर्य आणि नियमितेत तुम्ही जी मेहनत केली आहे, त्याचे परिणाम तुमच्या बाजुने असतील. जुन्या मित्रांशी गप्पा होतील. तुमच्या जबाबदारी पूर्ण कराल. पैसे कमावणे तुमच्यासाठी सहज बनेल. काम आणि यात्रेसाठी तुमच्याकडे जास्त पर्याय असतील. सोबतच्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे असेल. ऑफिसमध्ये कोणतीतरी नवी गोष्ट शिकायला मिळेल.


कुंभ : काही बदल होण्यास आजपासून सुरूवात होईल. रहस्यपूर्ण बाबींकडे तुमचा कल वाढेल. चांगला व्यवहार तुमहा यशस्वी बनवेलच त्याचसोबत तुम्हाला भेटणारे लोकही तुमच्या प्रेमात पडतील. तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. 


मीन : चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नवे प्लानिंग आणि संधी घेत तुम्ही कोणतातरी मोठा निर्णय घेऊ शकाल. नोकरी किंवा नव्या पदाची ऑफर मिळेल. मोठ्या अडचणी पूर्ण होतील. धन लाभ होईल. कमावण्याचे नवे मार्ग मिळतील. तुम्हाला कोणतातरी प्रवास करावा लागू शकतो. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामाने सर्वांना खुश कराल. 



-दीपक शुक्ला