मेष - गेल्या काही दिवसांपासून राहिलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंधात सुधार होतील. दिवस चांगला आहे. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष द्या. घरातील समस्या सुटतील. तब्येत चांगली राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - कामात व्यस्त राहाल. धनलाभ होण्याची शक्यता आङे. दिवस चांगला आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी सक्रिय राहाल. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. अविवाहितांच्या प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. काही महत्त्वपूर्ण कामासाठी प्रवास होऊ शकतो. 


मिथुन - पैशांसंबंधी चिंता राहील. वायफळ खर्च होईल. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील. नोकरी, व्यवसायात समस्या वाढण्याची शक्यता आहे.


कर्क - दररोजची कामं पूर्ण करण्यात समस्या निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अचानक अडचणी वाढू शकतात. कामात अडचणी आल्याने चिंता वाटेल. काही कामात अपेक्षित लोकांकडून मदत मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. मनात वेगळेच विचार सुरू राहतील. साथीदाराची साथ मिळेल. साथीदारासोबत अधिक चांगला दिवस व्यतित करू शकता. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. 


कन्या - कामात समस्या असल्यास त्या पूर्ण होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील. थकवा जाणवेल. आराम करा.  नियमित कामांतून काही वेळासाठी सुटका होईल. खास लोकांशी भेट होऊ शकते.


तुळ - नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. प्रगतीच्या दिशेने पुढे जाल. व्यवसायात अधिक प्रयत्न केल्यास यश मिळेल. स्वत:च्या फायद्याची काळजी करा. दुसऱ्यांना नाराज न करता चतुरतेने काम करा. कोणावरही आपल्या भावना जबरदस्ती लादू नका. 


वृश्चिक - कोणत्याची नवीन कामाची आज सुरूवात करू नका. दिवस काही प्रमाणात कठीण असेल. विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने मूड खराब होऊ शकतो. अविवाहितांच्या प्रेमसंबंधात तणाव वाढू शकतो. 


धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करून घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. पैशांसंबंधी चांगल्या संधी मिळू शकतात. साथीदारासोबत दिवस चांगला जाईल. प्रेमसंबंधांत यश मिळेल. तब्येतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. 


मकर - कोणतेही नवं काम हाती घेऊ नका. दिवसाची सुरूवात तेवढी चांगली होणार नाही. नको असतानाही पैसे खर्च होतील. कामात सुस्त राहाल. नातेवाईकांमध्ये कठीण समस्या उद्धवू शकते. वाद-विवादात अडकू नका. तब्येतीकडे लक्ष द्या.


कुंभ - ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. संपूर्ण ताकदीने काम पूर्ण कराल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा हाईल. चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. प्रयत्न केल्यास काही समस्या सोडवू शकाल. 


मीन - व्यवसायात काही बदल करू नका. जसं चालू आहे तसंच काम सुरू ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. सावध राहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या.