आजचे राशिभविष्य | सोमवार | ११ फेब्रुवारी २०१९
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. कौटुंबीक नाती सुधारतील. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. जुन्या आजारातून आराम मिळेल.
वृषभ - कामात व्यग्र असाल. नोकरीच्या ठिकाणी इतरांकडून आदर मिळेल. मेहनतीने पैसे कमवाल. अडकलेली कामं मार्गी लागतील. नवे करार, नवी नाती आकारास येतील. जीवनाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. महत्त्वाचे बदलही करावे लागतील. प्रवासयोग आहे.
मिथुन- घाईगडबडीत कोणतंही काम करू नका. अर्थिक स्थिती बेताचीच असेल. वायफळ खर्च वाढतील. नोकरी आणि व्यवसायात काही गोष्टींमुळे अडचणीत येऊ शकाल. आरोग्याविषयी निष्काळजीपणा नको. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा नको. आज मित्र आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये व्यग्र असाल. पोटाचे विकार उदभवण्याची शक्यता.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येतील. दैनंदिन कामांमध्येही अडथळे येतील. जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आज दिवसभर स्वभावात थोडा बुझलेपणा असेल. घाईगडबडीचं वातावरण असेल. झोप कमीच राहील. डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार उदभवू शकतात.
सिंह- कौटुंबीक सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी नवे करार आणि तडजोडी होण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्रांशी भेट घडेल. लक्ष वेगळ्याच कोणत्या गोष्टीवर असेल. अपूर्ण काम अखेर मार्गी लागेल, पूर्णत्वासही जाईल. मोठ्यांची मदत मिळेल.
कन्या- व्यवसायात वाढ होईल. कनिष्ठ सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. खास व्यक्तींची भेट होईल. नेहमीच्याच कामांतून थोडी उसंत मिळेल. दिवस थकवणारा असेल.
तुळ- नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणा फायदा होणार. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. पण, तरीही प्रगतीपथावर पुढे जाण्यासाठी जास्त कष्ट आणि मेहनत करावी लागेल. नशीबाची साथ आहे. कोणालाही न दुखावता कामं मार्गी लावा. साथीदारावर जास्त खर्च होईल.
वृश्चिक - व्यापारात तुलनेने फायदा कमीच होणार. बदली होण्याची शक्यता आहे. काही नवं काम सुरू कराल. दिवस काहीसा आव्हानात्मक आहे. कामाच्या ठिकाणची एकंदर परिस्थिती तुमचं मन विचलीत करू शकते. वायफळ कामांमध्ये वेळ वाया जाईल. काही कामं पूर्णत्वास न गेल्यामुळे चिडचीड होईल.
धनु- दैनंदिन कामं पूर्ण होतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक स्थितीत काही चांगले बदल होतील. कुटुंब आणि समाजात तुम्हाला मान मिळेल. साथीदाराशी असणारं नातं आणखी दृढ होईल. जेवणात तिखट पदार्थ टाळा.
मकर- नवे करार करू नका. पैसे अडकू शकतात. दिवसाची सुरुवात चांगली नसेल. कुटुंबातील मंडळींमुळे अडचणीत याल. वादांमध्ये अडकाल. जेवणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
कुंभ- आर्थिक चणचण संपुष्टात येईल. हाताशी येणारे पैसे आणि खर्च यात समतोल राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेवर ते पूर्णत्वास न्याल. धनलाभ होण्याची शक्यता. चांगल्या व्यक्तींशी ओळख असण्याचा फायदा होईल. प्रयत्नांनी अडचणींवर मात कराल. कोणत्या खास गोष्टीच्या निर्णयाविषयी विचार करत असाल तर धीराने घ्या आनंद मिळेल.
मीन- व्यापाराच्या कक्षा आणखी रुंदावण्याला प्राधान्य द्या. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. सावध राहा.
-दीपक शुक्ला