मेष : आज नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे पण पगार कमी येण्याचेही योग आहेत. कोणाला प्रपोज करण्यासाठी वेळ चांगली आहे पण विचार पूर्वकच हे काम करा. जुने दुखणे डोकं वर काढतील. ऑफिसमधील काही मंडळी तुमच्यापासून माहिती लपवण्याचा प्रयत्न करतील. सेव्हिंग आणि गुंतवणूकीचे प्लानिंग बनवू शकता. काही ठरवलेली कामे पूर्ण होतील. जास्त मेहनत करावी लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : घेण्यादेण्याच्या बाबतीत सतर्क राहा. ऑफिसमध्ये जास्त काम करावे लागेल. आज वृषभ राशीच्या लोकांचे कामात मन लागणार नाही. तुम्ही लपवलेली कोणती गोष्ट अचानक बाहेर येऊ शकते. तुम्हाला दिवसभर सतर्क राहावे लागेल. शनि-चंद्रमामुळे सेव्हिंग खर्च होतेय. घाई गडबडीत तुम्ही काही असे बोलून जाल की ज्याने तुमचे काम बिघडेल. दुखापत होऊ शकते. गाडी सावकाश चालवा. 


मिथून : घेण्या-देण्याच्या बाबतीत सतर्क राहा. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. कोणते तरी महत्वपूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. जुने रोग पुन्हा डोकं वर काढतील.  नेहमीच्या कामात मदत मिळणार नाही. कोणत्याही कामात घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. तुम्हाला काही नुकसान होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील समस्या आज वाढू शकतील. 


कर्क : काही ठरवलेली कामे पूर्ण न झाल्याने तुम्ही दु:खी व्हाल. आज पैशांचे योग बनतील. तणाव आणि धावपळीचा दिवस राहील. जास्त काम कराल पण फायदा कमी मिळेल. आज धावपळ खूप करावी लागेल.  आज तुम्ही कोणत्यातरी प्रकारची बेफिकरी देखील करु शकता. परिवारातील कोणत्या मोठ्या व्यक्तीची तब्ब्येत खराब होण्याची शक्यता आहे. 


सिंह : कामकाजात यश मिळेल. यशस्वी करार कराल. नोकरदार वर्गाला जास्त धन लाभ होण्याची शक्यता आहे. आज कामामध्ये मेहनत जास्त करावी लागेल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळाल्याने प्रसन्न वाटेल. वैवाहीक आयुष्यात आनंद मिळेल. काही आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्ही प्रयत्न कराल तर ठरवलेली कामे पूर्ण करु शकता. आज तब्ब्येत साधारण राहील. 


कन्या : आज तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल त्याचा फायदा देखील तुम्हाला मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. जुना त्रास संपू शकतो. चंद्र तुमच्या कर्म भाव ते मन भाव पाहील. यामुळे तुम्ही जुनी कामे संपवण्याचा विचार करु शकाल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकाल. आज तुम्ही रोमॅंटीक मूडमध्ये असाल. 


तूळ : गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरदार वर्गाने काम टाळू नका. सहकार्यांची मदत मिळेल. पैसे आणि परिवारामधअये सहयोग मिळाल्याने मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमचे करियर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न कराल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही समोरच्यावर प्रभाव पाडाल. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा. आरोग्याच्या प्रकरणात तुमचा दिवस चांगला जाईल. 


वृश्चिक : व्यवसायात काळजी वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोड सावध रहावं लागेल. आत तब्ब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. जुनी दुखणी डोकं वर काढतील.  हातपाय आणि अंगदुखी जाणवेल. आज कोणत्याही स्थितीचा विरोध कराल तर स्वत:लाच त्रास होईल. सावधान राहा. नवे काम सुरू करु नका. 


धनू : अचल संपत्तीतून फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. लव लाईफसाठी वेळ चांगली आहे. प्रेमी किंवा जोडीदारासोबत वेळ घालवा. परिवाराचे वातावरण चांगले राहील. नोकरी किंवा व्यवसायात महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या प्रकरणात फायदा होईल. आज कोणताही खास निर्णय विचापपूर्वक घ्याल. आज तुमच्या कामाचे कौतूक होईल. 


मकर : बेरोजगारांना काम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो. तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील. कोणते जुने कर्ज बाकी असेल तर आज देऊ शकाल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. पती-पत्नीचे संबंध मजबूत राहतील. तुमच्या कामकाजा बद्दल कोणती तरी बातमी तुम्हाला कळेल. मोसमी आजार डोकं वर काढतील. संभाळून राहा. 


कुंभ : नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. सहकारी देखील तुम्हाला कामात मदत करतील. जुने प्लानिंग पूर्ण झाल्याने फायदा मिळू शकतो. कोणते तरी नवे काम तुम्ही करु शकता. नव्या लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.  आज तुम्हाला प्रेम आयुष्यासाठी दिवस चांगला राहील. जुने रोग तुम्हाला त्रास देतील. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 


मीन : व्यवसायात मोठे निर्णय घेताना सावधानता बाळगा. नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कोणते तरी काम तुम्ही टाळू शकता. व्यवसाय किंवा नोकरीत जुन्या चुका किंवा कोणत्या तरी कामामुळे तुमच्या मनात भिती निर्माण होईल. आज तुमचे कोणते तरी प्लानिंग फसण्याची शक्यता आहे. मुलांसंबंधी प्रकरणात तुमची काळजी वाढेल. 


-दीपक शुक्ला