Todays Panchang : शुक्ल चतुर्दशी तुम्हाला फळण्याची शक्यता, पाहून घ्या आजचे शुभमुहूर्त
Todays Panchang : पंचांगाच्या माध्यमातून तुम्हाला बरीच अशी माहिती मिळते, ज्यामुळं आजच्या दिवसाच्या शुभ वेळा आणि तिथींबाबत मार्गदर्शन केलं जातं. ज्या माध्यमातून तुम्ही काही कामं सहजपणे मार्गी लावू शकता.
Todays Panchang 4 th May 2023 : आज गुरुवार, शुक्ल चतुर्दशी. आजचा दिवस अतिशय खास असल्यामुळं चला जाणून घेऊया या खास दिवसाच्या खास पंचागाबद्दल. पंचांग दैनंदिन आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतं. या माध्यमातून आपल्याला एखादं महत्त्वपूर्ण कार्य मार्गी लावण्यासाठीच्या योग्य वेळांची आणि मुहूर्तांची कल्पना मिळते. ज्याचे परिणाम अतिशय शुभ असतात. पंचागाच्या मदतीनं ग्रहांची दिशा आणि ते कोणत्या राशींना फळणार आहेत यांचीही माहिती मिळते.
मुख्य म्हणजे कोणत्या वेळी सावध रहावं, शुभकार्य करू नयेत याबाबतही पंचांग सुचित करतं. त्यामुळं पंचांगाला दैनंदिन राशीभविष्याइतकं किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वं प्राप्त आहे. इथं तिथीपासून चंद्र आणि ताराबलाची माहिती अगदी सहजपणे मिळते. चला तर, पाहुया आजचं पंचांग...
तिथी - चतुर्दशी - 23:45:55 पर्यंत
नक्षत्र- चित्रा
करण - गर, वाणिज
पक्ष- शुक्ल
योग - वज्र
सूर्योदय आणि सूर्यास्त
सूर्योदय - 05:38:21
सूर्यास्त - 18:57:52
चंद्रोदय- 17:44:00
चंद्रास्त - 29:11:00
चंद्ररास - कन्या
मुहूर्त आणि त्यांच्या वेळा
दुष्टमहूर्त - 10:04:52 पासुन 10:58:10 पर्यंत, 15:24:40 पासुन 16:17:58 पर्यंत
कुलिक - 10:04:52 पासुन 10:58पर्यंत
कंटक- 15:24:40 पासुन 16:17 पर्यंत
राहु काळ - 13:58:03 पासुन 15:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम - 17:11:16 पासुन 18:04:34 पर्यंत
यमघंट - 06:31:40 पासुन 07:24 पर्यंत
यमगंड - 05:38:21 पासुन 07:18 पर्यंत
गुलिक काळ - 08:58:14 पासुन 10:38 पर्यंत
हेसुद्धा वाचा : Horoscope 4 May 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अडचण वाटणारी गोष्ट फायदेशीर ठरेल!
चंद्रबल - वृश्चिक, धनु, मीन, मेष, कर्क, कन्या
ताराबल- हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि मथळ्यांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )