मुंबई : Lord Ganesha Favourite Zodiac Signs:  गणपती बाप्पाचे आगमन थोड्याच दिवसांवर आले आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा ही 31 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.  गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये राहतो आणि त्यांची सर्व दुःख दूर करुन त्यांना आनंद देत असतो. त्याचबरोबर काही लोक असेही असतात ज्यांच्यावर गणपती बाप्पाची सदैव कृपा असते. ज्योतिष शास्त्रात अशा 3 राशी सांगितल्या आहेत, ज्या भगवान गणेशाला खूप प्रिय आहेत आणि तो नेहमी त्यांच्यावर आपला आशीर्वाद देतो.  


...म्हणूनच या राशींवर गणपती राहतो कृपा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, समृद्धीचा कारक आहे आणि त्याचा संबंध भगवान गणेशाशी आहे. ज्योतिषशास्त्रात ज्या राशींचा बुध शुभ मानला जातो, त्यांच्यावर गणेशाची विशेष कृपा असते. 


मेष - मेष राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असते. यामुळे या लोकांचे काम लवकर होते आणि त्यांना चांगले फळही मिळते. या लोकांच्या कामात कमी अडथळे येतात आणि आले तरी ते आपल्या धैर्याने आणि पराक्रमाने दूर करतात. 


मिथुन - मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. यामुळे हे लोक बुद्धिमत्ता आणि संवादात खूप चांगले असतात. जर या लोकांनी व्यवसाय केला तर त्यांना त्यात भरपूर यश मिळते. त्याचबरोबर त्यांना नोकरीतही चांगले पद मिळते. या लोकांची कामेही श्रीगणेशाच्या कृपेने लवकर पूर्ण होतात. 


मकर - शनिदेवांसोबतच मकर राशीच्या लोकांवरही गणेशाची विशेष कृपा असते. त्यामुळे या लोकांना सहज यश मिळते. हे लोक आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने सर्वात मोठ्या आव्हानावर मात करतात. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी असतात.