Ganesh Chaturthi 2022: बाप्पाचा आशिर्वाद हवा असेल तर `या` चुका टाळा!
गणरायला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. पण गणरायाची आराधना करताना काही चुका केल्या तुम्हाला महागात पडू शकतात
Ganesh Chaturthi 2022 - हिंदू धर्मात गणेशाला विशेष महत्त्व आहे. चांगल्या कामाची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. काही दिवसांमध्ये गणरायाचं मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे. गणराया 10 दिवस आपल्यासोबत राहणार आहे. गणरायला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. पण गणरायाची आराधना करताना काही चुका केल्या तुम्हाला महागात पडू शकतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगणात आलं आहे. (trending news if you want the blessings of ganpati bappa, do not forget these eight big mistakes)
31 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी, गल्लीबोळ्यात गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे आपण जाऊन घेणार आहोत की, आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करताना कुठल्या चुका करायला नकोत त्या.
'या' चुका टाळा अन्यथा पूजा राहणार अपूर्ण!
1. गणपतीची मूर्ती विकत घेताना ती काळजीपूर्वक घ्या. कारण तुटलेल्या मूर्ती पूजा हे अशुभ मानली जाते. त्याशिवाय गणपतीची सोंड ही उजव्या बाजूला वाकलेली असल्यास ती अतिशय शुभ मानली जाते. अशा मूर्तीची पूजा केल्यास आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते.
2. वास्तूनुसार घरात कधीही गणपतीच्या दोन मूर्ती ठेवू नयेत. तसंच गणपतीची मूर्ती ईशान्य दिशेला अशा प्रकारे ठेवावी की पूजा करताना त्याची पाठ दिसू नयेत.
3. गणपतीची पूजा करताना कधीही काळे किंवा निळे कपडे परिधान करु नयेत. तर शुभ आणि आशीर्वाद मिळण्यासाठी लाल किंवा पिवळे कपडे घालून गणरायाची पूजा करावी.
4. गणेशजींच्या पूजेमध्ये फक्त त्यांच्या आवडत्या वस्तूच अर्पण कराव्यात. त्याशिवाय गणपतीला चढविण्यात येणाऱ्या भोगात विसरुनही तुळशीचा वापर करू नये.
5. गणेश चतुर्थीची उपासना आणि व्रत नेहमी शुद्ध मनाने करावी. या पवित्र तिथीला कोणाबद्दलही वाईट विचार करु नये आणि कोणाशीही खोटे बोलू नये. तसंच या दिवशी रागाच्या भरात कुणालाही अपशब्द बोलू नयेत.
6. गणेश चतुर्थी व्रत करणाऱ्या साधकांनी ब्रह्मचर्य पाळावे आणि उपवासाच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत.
7. गणपतीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने केवळ सात्विक फळेच खावीत.
8. गणेश चतुर्थीचा दिवस उंदरांचा छळ करू नये किंवा त्यांना मारु नयेत.
Vastu Tips: घरातील खोल्यांना द्या 'हे' रंग; गणरायासोबत घरात येईल सुख-समृद्धी
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)