Janmashtami 2022 Date - आता घरोघरी वेध लागले आहेत ते जन्माष्टमीचे. भाद्रपद महिना सुरु झाला की पहिला सण येतो तो श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. श्रीकृष्णचा जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मथुरा, काशीमध्ये जन्माष्टमीचा मोठ्या उत्साह असतो. तर महाराष्ट्रात जन्माष्टमी आणि गोपाळकाला साजरा करण्यात येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरोघरी कृष्णाचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. पण यंदा कान्हाजींचा जन्मदिवस 18 ऑगस्टला आहे की 19 ऑगस्टला याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. चला तर जाणून घेऊयात बालगोपाळचा जन्मदिवस आणि त्यांना प्रसन्न करण्याची कुठला मुहूर्त शुभ आहे. (trending news janmashtami 2022 right date shubh muhurat puja vidhi and how to please lord shri krishna in marathi)


जन्माष्टमी कधी साजरी करायची आणि शुभ मुहूर्त


कृष्णभक्त भाद्रपदाची अष्टमी तिथी 18  ऑगस्ट रोजी रात्री 9.20 वाजता सुरु होणार असून 19 ऑगस्टला रात्री 10.59 वाजता समाप्त होणार आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे 18 ऑगस्टच्या रात्री जन्माष्टमी साजरी करायची आहे. विशेष म्हणजे या दिवशी ध्रुव आणि वृद्धी योग असून हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. आपल्या लाडक्या बाळगोपाळला प्रसन्न करण्याचा शुभ मुहूर्त 18 ऑगस्टच्या रात्री 12.03  ते 12.47 पर्यंत आहे. 


पूजा विधी 


18 ऑगस्टला रात्री 12.03 वाजता कृष्णाचा जन्म झाल्यावर त्याला दूध, दही, तुप पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर कृष्णाला पोषाख, दागिन्यांनी सजवा आणि फुलांनी सजलेल्या पाळण्यात विराजमान करा. त्यांनतर माखन मिश्री, पंजिरी अर्पण करा. याशिवाय श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र, तुळश, फुले आणि फळे अर्पण करा. बाळ गोपाळाला धूप दाखवा. त्यानंतर तान्हुल्या बाळगोपाळाला पाळण्यात झुलवा आणि कुटुंबियांसोबत कृष्णाचे भजन म्हणा. यानंतर ज्या पंचामृताने कान्हाचा अभिषेक केला त्याचा प्रसाद सगळ्यांना द्या. 



(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)