Shukra Gochar 2023  :  ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, ऐश्वर्य, आनंद आणि सुखांचा कारक मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या भाग्याशी जोडला जातो. शुक्र ग्रह 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम 5 राशींवर दिसून येणार आहे. 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट कोसळणार आहे. शनी आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. कुंभ राशीत आधीपासूनच शनी विराजमान आहे. आता शुक्र पण कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. 


कधी करणार शुक्र कुंभ राशीत प्रवेश? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 22 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.34 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हा त्याचा मित्र ग्रह शनीची राशी आहे. शुक्राच्या या संक्रमणाने काही राशींच्या नशिबाची कुलुप उघडणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8.12 वाजेपर्यंत शुक्र कुंभ राशीत राहिल. यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. 



सिंह (Leo)


शुक्र (Shukra Gochar 2023)  च्या संक्रमणाने या राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येणार आहे. विवाहित लोक जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवेल. तर अविवाहित लोकांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी लाभेल. व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. ज्या लोकांना नोकरीमध्ये बदल करायचा असेल त्यांसाठी चांगली ऑफर चालून येणार आहे. नोकरदारांसाठी हा चांगला काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, नवीन जबाबदारी देण्यात येईल. 


 


मेष (Aries)


या राशीसाठीही हा काळ खूप चांगला असणार आहे. अनेक प्रभावशाली लोकांच्या ते संपर्कात येणार आहेत. या काळात त्यांची कारकीर्द वेगवान होणार आहे. बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ चांगला असणार आहे. या राशींच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे. एकंदरीत हा काळ खूप चांगला आणि उत्साही असणार आहे. 


मीन  (Pisces)


मात्र मीन राशींच्या लोकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचं आहे. शुक्रच्या संक्रमणामुळे या राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. चैनीच्या गोष्टींपासून दूर राहणे या राशींच्या लोकांसाठी चांगल राहिल.  बजेट बनवून फक्त गरजेच्या गोष्टींवर पैसे खर्च करा अन्यथा आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय या राशींच्या लोकांनी या काळात आरोग्याकडेही लक्ष द्या. तुमची एक चूक मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकते. 



धनु (Sagittarius)


लेखन कार्याशी संबंधित लोकांचं भाग्य उजळून निघणार आहे. यामध्ये लेखक, ब्लॉगर, पत्रकार, कवी, कादंबरीकार अशा लोकांसाठी शुक्र राशीचं संक्रमण चांगला काळ घेऊन आला आहे. त्याचं लेखन कौशल्य आणखी सुधारेल. तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो. अगदी कुटुंबासोबत तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. लहान भावंडांशी तुमचं संबंध चांगले राहतील. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या तरुणांची इच्छाही पूर्ण होऊ शकते. कुटुंबात एकता आणि शांतता राहील.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)