Trigrahi Yog: बुध ग्रहाच्या गोचरमुळे बनणार त्रिग्रही राजयोग; `या` राशींना मिळणार अपार धनलाभ
Mercury Transit In Aquarius: बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होतोय. या काळात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Mercury Transit In Aquarius: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. ग्रहांच्या या गोचरमुळे शुभ योग तयार होतात. अनेकदा एका राशीत तीन ग्रहांच्या मिलनामुळे त्रिग्रही राजयोग तयार होतात.
ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शनि आधीच कुंभ राशीमध्ये स्थित आहेत. अशा स्थितीत सूर्य आणि बुध एकत्र कुंभ राशीत बुधादित्य योग तयार होणार आहे. याशिवाय बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होतोय. या काळात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
त्रिग्रही योगामुळे तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. या राजयोगाचे अनुकूल परिणाम मिळतील. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मिथुन रास (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. या काळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात भागीदार देखील मिळू शकेल ज्याला भविष्यात नफा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
मेष रास (Aries Zodiac)
त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा योग तयार होणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही प्रगती कराल. तुमच्या कामाचा दर्जा चांगला राहील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )