मुंबई : हिंदू कुटुंबातील घरांमध्ये तुळशीचं रोप हे असतंच. सनातन धर्म आणि तुळशी हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असंही तुम्ही म्हणू शकता. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या वनस्पतीचीही फार काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या रोपाची काळजी घेताना कोणत्या चुका करू नयेत हे सांगणार आहोत.


वातावरणातील बदलाचा तुळशीवर होतो परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामानात बदल झाल्यावर ज्याप्रमाणे माणसाला थंडी आणि उष्णता जाणवते, त्याचप्रमाणे तुळशीच्या झाडांनाही हवामानात अचानक होणाऱ्या बदलांचा त्रास होतो. त्यामुळे मे-जूनसारखा कडक उन्हाळा किंवा डिसेंबर-जानेवारीसारखी कडाक्याची थंडी असेल तेव्हा तुळशीचे रोप लाल कापडाने झाकून ठेवावे. असे केल्याने तो ऋतुमानाच्या प्रभावापासून वाचतो.


या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये


कुटुंबात चांगला फायदा होण्यासाठी दररोज तुळशीला पाणी अर्पण करणं चांगलं मानलं जातं. मात्र रविवारी, एकादशी, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दिवशीही तुळशीला पाणी अर्पण करू नये. असं करणं शास्त्राच्या विरुद्ध आहे. यासोबतच रविवारी तुळशीची पानंही तोडू नयेत. असे केल्याने सूर्यदेव नाराज होतात, ज्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होतो.


या दिवशी तुळशीजवळ दिवा लावू नये


अनेक भक्त त्यांच्या सोयीनुसार वाटेल तेव्हा तुळशीच्या रोपांजवळ दिवा लावतात. यात काहीही नुकसान नसलं तरी जास्तीत जास्त फायद्यासाठी तुळशीवर दिवा संध्याकाळीच लावावा. यासोबतच रविवारी तुळशीला दिवा लावू नये. असं मानलं जातं की, गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावं. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)