Guruwar Che Tulsi Upay : हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. तसेच तुळशीची पूजा केली जाते. (Tulsi Upay) तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते. तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो. त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नशिब चकमकून जाईल. (Guruwar Che Upay) जाणून घ्या कोणते उपाय करायचे आहेत ते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूची पूजा आई तुळशीशिवाय अपूर्ण आहे, जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूला अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुख-शांती राहते. असे मानले जाते की गुरुवारी तुळशीसोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते. 


Guruwar Che Tulsi Upay


आपल्या हातात  पैसा हवा असेल तर गुरुवाचे उपाय करणे महत्वाचे आहे. तुमच्या जीवनात आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करुन तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावत नाही. 


गुरुवारी या गोष्टींवर विशेष लक्ष द्या


गुरुवारच्या दिवशी चुकूनही उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे.  गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुवू नयेत किंवा साबण वापरु नये. गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशीपूजनाच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूची पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)