Ekadashi November 2022: हिंदू धर्माशास्त्रानुसार दर महिन्याला दोन एकादशी येतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी येते आणि एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते. धार्मिक शास्त्रानुसार एकादशी या दिवशी भगवान विष्णूपासून देवी एकादशीचा जन्म झाला होता. एकादशीचा व्रत केल्यास संतान सुख, आरोग्य आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. आता 20 नोव्हेंबर 2022 रोजी उत्पन्ना एकादशी आहे. या निमित्त चार अद्भुत योग जुळून आले आहेत. उत्पन्ना एकादशीच्या दिवशी अमृत सिद्धी, सर्वार्थ सिद्धी, प्रीति आणि आयुष्मान असे चार शुभ योग तयार होत आहेत. अनेक शुभ योग जुळून आल्याने उत्पन्ना एकादशीचे व्रत केल्यास दुप्पट फळ मिळेल, असं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला एकादशी व्रत सोडले जाते. 20 नोव्हेंबर 2022 रोजी येणार्‍या उत्पन्ना एकादशी व्रताच्या पारणाची वेळ 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजून 51 मिनिटे ते 9 वाजेपर्यंत असेल.


  • सर्वार्थ सिद्धी योग - 20 नोव्हेंबर 2022 सकाळी 06 वाजून 50 मिनिटं ते 21 नोव्हेंबर 2022 दुपारी 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत

  • आयुष्मान योग - 20 नोव्हेंबर 2022 रात्री 11 वाजून 04 मिनिटं ते 21 नोव्हेंबर 2022 रात्री 09 वाजून 07 मिनिटांपर्यंत

  • अमृत ​​सिद्धी योग - 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 06 वाजून 50 मिनिटं ते 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत

  • प्रीति योग- 20 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजून 26 मिनिटं ते सकाळी 11 वाजून 04 मिनिटापर्यंत


बातमी वाचा- Budhadiya Yog: वृश्चिक राशीत सूर्य-बुध यांची युती, या राशींचं पालटणार नशीब


उत्पन्ना एकादशी व्रताचे नियम


एकादशी व्रतामध्ये काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा व्रताचे फळ मिळत नाही. एकादशीपूर्वी दशमीच्या रात्रीपासून अन्न खाऊ नये. तर शक्य असल्यास एकादशीच्या संपूर्ण दिवशी पाण्याविना उपवास करावा. तसेच या दिवशी घरी भात शिजवू नये. एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून व्रत संकल्प करावा. नित्य पूजा पाठ आटोपल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा आणि विष्णू सहस्रनामावलीचा पाठ करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)