Vastu Shastra: `या` पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध
Lucky Things For Home: महर्षि दुर्वासाच्या श्रापामुळे स्वर्गातील वैभव, ऐश्वर्य आणि धन नष्ट झालं होतं. यानंतर देवांनी भगवान विष्णुंचा धावा केला. तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याची सूचना केली होती.
Auspicious Things Vastu: वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूचं स्वत:चं असं महत्त्व आहे. प्रत्येक वस्तूत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच वास असल्याचं वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) सांगितलं आहे. काही वस्तूंमधून सकारात्मक उर्जेचा संचार घरात होतो असं सांगितलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार काही वस्तूंना महत्त्व देण्यात आलं आहे. पौराणिक ग्रंथानुसार देव आणि असुरांमध्ये समुद्र मंथन (Samudra Manthan) झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महर्षि दुर्वासा यांच्या श्रापामुले स्वर्गातील वैभव, ऐश्वर्य आणि धन समाप्त झालं होतं. त्यामुळे देवी-देवतांनी भगवान विष्णुंकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी समुद्र मंथन करण्याचं सुचवलं होतं. समुद्र मंथनातून 14 अमूल्य रत्न निघाली होती. यापैकी काही वस्तू घरात ठेवल्यास आर्थिक उन्नती होते असं सांगितलं जातं. चला जाणून घेऊयात या वस्तू कोणत्या आहेत.
पांचजन्य शंख- समुद्र मंथनातून निघालेल्या रत्नांमध्ये पांचजन्य शंखाचा समावेश आहे. भगवान विष्णुंच्या हातात तुम्हाला हा शंख दिसेल. हा शंख घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा संचार होतो.
पारिजातकाचं फूल- हिंदू मान्यतेनुसार पारिजातकाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. हे झाड समुद्रमंथनातून निघालं होतं. मंदिरात पारिजातकाचं फूल वाहणं शुभ मानलं जातं. पारिजातकाच्या सुगंधामुळे वातावरणात चैतन्य पसरतं.
उच्चै: श्रवा घोडा- पौराणिक कथेनुसार, हवेत उडणारा घोडा समुद्र मंथनातून निघाला होता. हा घोडा असुरांचा राजा बलि यांना देण्यात आला होता. समुद्र मंथनातून निघालेल्या पांढऱ्या घोड्याचा फोटो घरात लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते.
बातमी वाचा- Guru Margi: वक्री गुरु होणार मार्गस्थ, कुंडलीत खराब स्थिती असल्यास काय होतं? जाणून घ्या उपाय
अमृत कलश- समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर आला होता. भगवान धन्वंतरी हा कलश घेऊन आले होते. यामुळे देव आणि असुरांमध्ये वाद झाला होता. मंगलकार्यात अमृत कलश स्थापित करण्याची परंपरा तेव्हापासून रुजू झाली. यामुळे घरात सुख शांती लाभते.
ऐरावत हत्ती- समुद्रमंथनातून निघालेल्या ऐरावत हत्ती देव राजा इंद्राचं वाहन आहे. समुद्रमंथनातून निघालेला हत्ती पांढरा होता आणि उडू शकत होता. हा हत्ती क्रिस्टल किंवा संगमरवरीत घरात ठेवू शकता. यामुळे सुख समृद्धी घरात येते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)