Vastu Shastra : घरात चुकूनही `या` दिशेला ठेवू नका चप्पल- बूट; नाहीतर लक्ष्मीची अवकृपा झालीच समजा
Vastu Tips : वास्तूच्या या महत्त्वाच्या घटकांशी नसता खेळ नकोच...
Vastu Tips for Shoe Rack: वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक घर, वास्तूची दिशा आणि सामानाशी संबंधितही काही नियम सांगण्यात आले आहेत. चुकीच्या जागी चुकीची गोष्ट ठेवली असता त्याचे थेट परिणाम त्या वास्तूत वावरणाऱ्यांवर होतात. याविषयी सर्वच जाणतात. वास्तू आणि तेथील वातावरण नकळत करियर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि वैवाहिक आयुष्यावर परिणाम करत असतात. चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच.
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घराच्या उत्तर - पूर्व दिशेला चप्पल किंवा बूट ठेवणं, फार अशुभ ठरतं. ही दिशा सकारात्मकतेची आहे, त्यामुळं तिथं पादत्राणे ठेवू नका. घरातील लक्ष्मी निघून जाईल. (Vastu Shastra tips for Shoe Rack)
बेडरुममध्येही चप्पल किंवा बूट ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक उर्जा फोफावते. उशीपाशीही चप्पल काढून झोपू नका, हे अतिशय अशुभ आहे.
ज्यांना जीवनात प्रगतीपथावर पुढे जायचं आहे, त्यांनी निळ्या रंगांच्या चपलांना प्राधान्य द्या. असं केल्यास प्रत्येक कामात यश मिळतं.
मळकट किंवा फाटलेल्या चपला किंवा बूट कधीच वापरु नका. असं केल्यास समाजात तुमची प्रतिमा मलीन होते. आर्थिक फटका आणि दारिद्र्याचं हे लक्षण आहे.
वास्तुशास्त्रानुसार कधीच पिवळ्या रंगांच्या चपला वापरू नका. पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळं त्या रंगाची चप्पल किंवा बूट घातल्यास तुमचं भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही.