ताटापासून मीठापर्यंत चपाती बनवताना `ही` कामं नक्की करा! घरात नांदेल सुख समृद्धी
Vastu Tips For Roti : वास्तूशास्त्रात घरात कायम लक्ष्मीचं वास राहवा म्हणून चपाती किंवा पोळ्या भाकरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास घरात संपत्ती अमाप वाढ होते.
Vastu Tips to become Rich : भारतात प्रत्येक घरात चपाती, पोळी किंवा भाकरी बनवली जाते. खरं तर पोळीशिवाय भारतीयांचे जेवण अपूर्ण असतं. धार्मिक ग्रंथातही चपाती, पोळीला अन्यन साधारण महत्त्व आहे. पोळी आणि घरातील सुख समृद्धीचं यांचं घनिष्ठ नातं आहे. वास्तू शास्त्रात घरात कायम धन संपदा राहावी म्हणून काही नियम सांगण्यात आले आहे. त्यात चपातीचं पीठ भिजवण्यापासून ते ताटात चपाती सर्व्ह करण्याच्या वेळेपर्यंत अनेक नियम सांगण्यात आले आहे. (vastu shastra vastu tips for roti make to become rich follow these tips)
शास्त्र पंडितांनुसार तुम्ही या नियमाचं पालन केल्यास घरात ऐश्वर्य आणि सुख समृद्धी नांदते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चपाती संबंधित कोणते नियम सांगण्यात आले आहे, ते जाणून घेऊयात.
हे नियम पाळा आणि घरात अपार संपत्ती मिळवा!
1. वास्तुशास्त्रानुसार, आधीच मळलेल्या पिठापासून कधीही चपाती बनवू नका. बरेच जण उरलेले पीठ ठेवतात आणि नंतर त्याच्याच चपाती बनवतात. शिळ्या चपाती आणि पीठाचा राहू ग्रहाशी संबंध आहे. अशा शिळ्या चपाती आणि पोळ्या खाल्ल्यामुळे आरोग्यास धोका होतो. जर तुमच्याकडे शिळं पीठ राहिल्यास कुत्र्याला खाऊ घाला.
2 धार्मिक शास्त्रानुसार पहिली पोळी गाईसाठी बनवा. हिंदू धर्मात गाईमध्ये माता लक्ष्मीसह सर्व देवी देवातांचा वास असतो. त्यामुळे पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला दिली जाते. अशा घरात कधीही पैसा आणि धान्याची कमतरता भासत नाही.
3 घरातील स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व दिशेला असावं. जेणेकरून पोळी बनवताना तुमचे तोंड पूर्वेकडे असायला हवं, असं वास्तूशास्त्रात सांगितलं जातं. असं केल्यामुळे शुभ फळं मिळतात, असं म्हणतात.
4 चपाती बनवताना कधीही तव्यावरुन थेट ताटात ती ठेवू नका. तव्यावरुन आधी पाळी प्लेट किंवा ट्रेमध्ये ठेवा आणि नंतर ती जेवण्याच्या ताटात सर्व्ह करा.
5 रोटीसाठी पिठ मिळताना मिठा सोबत थोडं तूप आणि काही दाणे साखर मिसळा. माँ लक्ष्मी आणि शुक्र यांच्या आशीर्वादाने धन, विलासी जीवन, वैभव आणि ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होते.