Crassula Plant: मनी प्लांटपेक्षा हे रोप आहे प्रभावी, वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या
जाणून घ्या, Crassula Plant वास्तुशास्त्रानुसार क्रॅसूलाचे फायदे आणि ते झाड ठेवण्याची योग्य दिशा...
मुंबई : आपल्या कुटुंबात ( Vastu Tips ) सुख-समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले रहावे आणि त्याला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस परिश्रम करतो, परंतु काही वेळा प्रयत्न करूनही समस्यांपासून सुटका मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वास्तूची मदत घेऊ शकता. वास्तूमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे जीवनातील समस्या कमी केल्या जाऊ शकतात. वास्तूनुसार घर किंवा ऑफिसमध्ये काही झाडे लावल्याने जीवनात सुख-शांती येते. यापैकी एक झाड म्हणजे क्रॅसुला. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते हे बहुतेक लोकांना माहित आहे, तर घरात क्रॅसुला वनस्पती देखील खूप चांगले असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटपेक्षा क्रॅसुला झाड हे चांगला प्रभाव दाखवते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार क्रॅसूलाचे फायदे आणि ते झाड ठेवण्याची योग्य दिशा... (Crassula Plant)
क्रॅसुला वनस्पती खूप शुभ आहे...
वास्तुशास्त्रात क्रॅसुला वनस्पती अतिशय शुभ आणि लाभदायक मानली गेली आहे. हे झाड घरात लावल्यानं व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संपत्तीचे नवे मार्ग खुले होतात. आपल्याकडे जसे वास्तुशास्त्र आहे, तसेच चीनमध्ये फेंगशुई आहे. फेंगशुईच्या मते, क्रॅसुला हे असं झाड आहे की ते घरात लावल्यानं आर्थिक परिस्थीत सुधारते. घर किंवा कार्यालयात हे झाड लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते. जर तुमच्याकडे पैसा असेल, पण पैसा टिकत नसेल तर तुम्ही क्रॅसुला लावू शकता. (Vastu Tips Crassula Plant)
Crassula वनस्पती फायदे
क्रॅसुला झाड घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. यासोबतच या झाडामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात. नोकरीतही प्रमोशनचे मार्ग लवकरच खुले होतील.
क्रॅसुला झाड लावण्यासाठी योग्य दिशा
क्रॅसुला रोप लावणं खूप शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला क्रॅसुला झाड ठेवा. याशिवाय तुम्ही ते तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरही ठेवू शकता. ( Vastu Tips Crassula Plant For Good Luck Prosperity And Money)
क्रॅसुला वनस्पतींची नावे
हेही वाचा : Aamir Khan ची लेक Ira कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेंडसोबत झाली कोझी, पाहा Viral Photo
क्रॅसुला वनस्पतीला मनी ट्री, फ्रेंडशिप ट्री, लकी प्लांट, जेड प्लांट असेही म्हणतात. तसेच त्याला कुबेराशी झाड आणि मनी मॅग्नेट असेही म्हणतात. त्याची खासियत त्याच्या नावावरूनच ओळखली जाते. (Vastu Tips Crassula Plant For Good Luck Prosperity And Money In Life Know Details)
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)