`या` वनस्पतीत धन आकर्षित करण्याची शक्ती! मनी प्लांटपेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा असते.
Crassula Plant Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा असते. घरात सकारात्मक उर्जा असलेल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या तर घरातील अडचणी कमी होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही वनस्पती सुचवण्यात आल्या आहेत. या मनी प्लांट आणि जेड प्लांटचा समावेश आहे. मात्र मनी प्लांटपेक्षा क्रासुला प्लांट सर्वाधिक प्रभावी असल्याचं काही मत काही वास्तुशास्त्र तज्ज्ञांचं आहे. हे रोप दिसायला खूपच लहान आहे. पाने लहान आणि पसरतात. वास्तुशास्त्रानुसार क्रासुलाचे फायदे आणि योग्य दिशा जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रात क्रासुलाचं रोपटं अतिशय शुभ मानली जाते. असे मानले जाते की, हे रोपटं घरामध्ये लावल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते. तसेच पैशाचे नवीन मार्ग खुले होतात. वास्तुशास्त्रानुसार क्रासुला प्लांटला संपत्तीचं रोपटं म्हणूनही ओळखलं जाते. पण हे रोपटं योग्य दिशेने असणं आवश्यक आहे.
क्रासुला प्लांटचं फेंगशुईमध्येही महत्त्व आहे. हे रोपटं घरात लावल्याने पैसा आकर्षित होतो, असं मानलं जातं. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुमच्याकडे पैसे असूनही टिकत नसतील, तरीही तुम्ही क्रासुला रोप लावू शकता.
रोप कोणत्या दिशेला ठेवावं
वास्तुशास्त्रानुसार क्रासुलाचं रोप प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवावं. पुरेसा सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवावं, या रोपाला जास्त काळजीची आवश्यकता नाही. आठवड्यातून 2-3 वेळा पाणी देणे पुरेसे आहे.
क्रासुला रोपाचे फायदे
क्रासुला रोप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते. क्रासुला रोप व्यक्तीच्या आर्थिक समस्या नष्ट करते. यामुळे पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात.