मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरी झाडं असतात. असं म्हणतात की, घरामध्ये हिरवी झाडं लावल्याने सकारात्मकता येते आणि तुम्हाला उत्साही वाटतं. काही लोकांना घरामध्ये तसंच ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलवर हिरवी झाडं ठेवायला आवडतात. वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये बांबूचे रोप लावणे खूप फायदेशीर आहे. बांबूच्या रोपामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकट दूर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे रोप व्यक्तीचं नशीब उजळण्याचं काम करते. मात्र, ते योग्य दिशेला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हे रोप योग्य दिशेला ठेवलं नाही तर तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया बांबू रोप लावण्यासाठी योग्य दिशा.


  • वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला घर किंवा ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावायचं असेल तर त्याची दिशा पूर्व दिशा आहे. या दिशेला बांबूचे रोप लावल्यास घरात सुख-शांती राहते. यासोबतच आर्थिक स्थितीही सुधारते.

  • हे रोप कधीही खिडकीजवळ ठेवू नये. कारण, ही वनस्पती उन्हात खराब होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होतो.

  • वास्तूनुसार 2 ते 3 फूट उंचीपर्यंत वाढणारी बांबूची झाडं शुभ मानली जातात. ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावल्याने वातावरण चांगलं राहतं आणि त्याचबरोबर तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता येत नाही.

  • वास्तुशास्त्रानुसार, बांबूच्या रोपाबद्दल अनेक समजुती आहेत. असं म्हटलं जातं की, बांबूचं रोप लावल्याने रोग दूर होतात आणि व्यक्तीचे शरीर निरोगी राहते. शिवाय बेडरूममध्ये बांबूचे रोप लावल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहतं आणि पती-पत्नीचे नातं अधिक मजबूत होतं.

  • (टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)