मुंबई : वास्तुशास्त्रात दिशा, घराची सफाई आणि सजावट यांना फार महत्व आहे. यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संपूर्ण गोष्टी केल्यातर आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी टिकून राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगलं राहातं. यागोष्टीचा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रांच्या नियमांचे पालन करणं फायद्याचं असल्याचं बोललं जातं. परंतु तुम्ही जर वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या नाहीत, तर मात्र तुम्हाला याचे नुकसान देखील सहन करावे लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तूमध्ये मानवाच्या दैनंदिन कामांबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे आंघोळ. आंघोळीला केवळ वास्तूमध्ये महत्व नाही, तर सनातन धर्मातही याला विशेष महत्त्व दिले गेले आहे.


कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्नान करणे चांगले मानले जाते. आंघोळ केल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते.


चला तर जाणून घेऊया की, वास्‍तुनुसार आंघोळ केल्‍यानंतर आपण कोणकोणत्या चुका करतो, ज्या आपल्यासाठी नुकसानकारक आहेत.


आंघोळीनंतर कपडे धुणे


काही लोकांना अशी सवय असते की, ते अंघोळ केल्यावर आपले कपडे बाथरूममध्येच ठेवतात आणि हे कपडे संध्याकाळपर्यंत असेच राहतात. वास्तूमध्ये ही मोठी चूक मानली जाते.


खरंतर आंघोळीपूर्वी कपडे धुवावेत, बरेच लोक कपडे घालून आंघोळ खरतात आणि नंतरते धुण्यासाठी ठेवतात. परंतु असे अजिबात करू नका, कारण वास्तुनुसार ही चूक तुमचे नुकसान करू शकते.


बाथरूम घाण करुन सोडणे


अनेकांना सवय असते, की ते आंघोळ केल्यावर स्वतःला स्वच्छ करतात, पण बाथरूम मात्र घाण करुन ठेवतात. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासू शकते.


वास्तूमध्ये बाथरूमच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आंघोळीनंतर, नेहमी स्नानगृह व्यवस्थित स्वच्छ करा आणि गोष्टी जागच्या जागी ठेवा. तसेच आठवड्यातून एकदा बाथरूम पूर्णपणे स्वच्छ करा.


बादलीत घाण पाणी ठेवणे


ज्योतिष शास्त्रानुसार बादलीत साबणाचं पाणी किंवा घाण पाणी तसंच ठेवल्याने राहू आणि केतू नाराज होऊ शकतात. असे म्हणतात की जे लोक स्वच्छतेकडे योग्य लक्ष देत नाहीत त्यांना अनेकदा राहू आणि केतूच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर बादली धुवून स्वच्छ पाण्याने भरा.