Vastu Shastra for New year 2023:  नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. प्रत्येकाला वर्षाच्या पहिल्या दिवशी असे काहीतरी करायचे असते जेणेकरुन त्यांचे संपूर्ण वर्ष नशीबाने उंचावेल. जर तुम्हाला असचं सुंदर आयुष्य पाहिजे असेल तर तुम्ही या पाच गोष्टी करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. चला तर मग जाणून घेऊया त्या पाच गोष्टीबद्दल... 


नवीन वर्षात या 5 गोष्टी घरी आणा


धातूचे कासव (Metal turtle)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी धातूपासून बनविलेले कासव खरेदी केल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच बिघडलेल काम सुधारण्यास मदत करते. त्यासाठी 1 जानेवारी रोजी पितळ, चांदी किंवा पितळापासून बनवलेले कासव खरेदी करा (
Buy a turtle) आणि ते घरी ठेवा. यामुळे तुम्हाला फायदा होईल.


मोती शंख (pearl conch)


घरामध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोती शंख (Vastu Tips for New year 2023) खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या मोती शंखांमुळे घरात नेहमी पैशाचा ओघ राहतो आणि कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीला मोत्याचा शंख विकत घेऊन त्याची पूजा करून पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे तुमच्या पैशांचा साठा भरलेला राहील.


वाचा : बांग्लादेशविरुद्ध कसोटीत 'या' खेळाडूला टीम इंडियात संधी नाही, कारण...


लहान नारळ (coconut)


वर्षाच्या पहिल्या दिवशी सुके खोबरे (Vastu Tips for New year 2023) लहान आकारात खरेदी करणे देखील चांगले मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार नारळ हे कोरडे असो वा पाणीचा, ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी एक नारळ खरेदी करून त्याची विधिवत पूजा करावी आणि नंतर घराच्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहिल. 


तुळशीचे रोप (Basil plant)


घरामध्ये तुळशीचे रोप (Vastu Tips for New year 2023) लावणे नेहमीच शुभ मानले गेले आहे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप अजून लावले नसेल तर तुम्ही हे रोप नवीन वर्षाच्या सुरूवातीला विकत घ्या आणि नंतर पूजा केल्यानंतर घराच्या आत किंवा अंगणात लावा. या प्रकारची रोपे लावल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते.


मोराचे पंख


भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. भगवान विष्णूचा मानव अवतार म्हणून त्यांचा जन्म पृथ्वीवर झाला. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची जीवनसाथी आहे. असे म्हणतात की ज्या घरातील मंदिरात मोराचे पिसे असते, तिथे माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी मोराची पिसे आणायला विसरू नका.


 


 



(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)