Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर
Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Vastu Tips For Kitchen Tap: आपले घर म्हणजे एक महत्वाची वास्तू आहे. या आपल्या वास्तुत प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. वास्तुशास्त्रात घराचे किचन महत्वाचे आहे. घराच्या ड्रॉईंग रुमपासून बाथरूम आणि किचनपर्यंत काही महत्त्वाचे नियम देण्यात आले आहेत. त्यामुळे आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसेच हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे कंगाल होण्याची वेळ तुमच्यावर येते. तसेच काही वेळा घरावर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.
घरातील किचनमध्ये गळका नळ नसाला, असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात या छोट्या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल आपण विचारही करु शकत नाही की, या गोष्टी घरात दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. यापैकी एक म्हणजे स्वयंपाकघरातील गळती लागलेला नळ. नळातून पाणी टपकत असेल तर तुमच्याकडे पैसा टिकत नाही. हळूहळू तुमचा पैशाचा खजिना रिकामा होत जातो. वास्तु तज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते जाणून घ्या.
किचन नळ गळका असेल तर...
घरात नळ गळका असेल तो तात्काळ बदला. जर तुमच्या घरात कुठेतरी नळ टपकत असेल तर समजून घ्या की हे घरामध्ये उधळपट्टी होणार आहे. यामध्येही जर नळ स्वयंपाकघरातील असेल तर ते अधिक अशुभ मानले जाते. ज्यावेळी नळातून पाणी गळत असते आणि दुसरीकडे आग. अशा स्थितीत ते तुमच्यासाठी लकी नसते. वास्तू तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या दोन्हींच्या मिश्रणामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
पैशाची तिजोरी होते कमी
आपल्या स्वयंपाक घरातील नळ गळका असेल तर तुमच्यासाठी चांगले नाही. स्वयंपाकघरातील नळातून पाणी टपकल्याने घरात अनेक प्रकारचे नुकसान होते. त्यामुळे कुटुंबीयांना अनेक प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उदाहरणार्थ, कुटुंबातील एखादा सदस्य पुन्हा पुन्हा आजारी पडतो. घरामध्ये झीज होऊन व्यवसायात मोठे नुकसान आणि पैशाचा अपव्यय होतो. त्यामुळे तुमची तिजोरी खाली होते. तुम्ही कंगाल होऊ शकता.
घरात समस्या निर्माण होतात
घरात विनाकारण पाणी वाहत असेल तर घरात दोष निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहते. त्यामुळे संकट उभे राहू शकते. घरात तुमच्या नळातून पाणी टपकत असेल किंवा गळती लागली असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करणे चांगले.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)