Vastu Tips For Kitchen : वास्तुशास्त्रानुसार घरातील सुख समृद्धी साठी अनेक गोष्टींचे पालन करावे लागते. कारण जर वास्तुशास्त्रातील काही गोष्टी पाळल्या नाही तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या नियमांपैकी एक म्हणजे कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हवी आणि ते सुद्धा योग्य दिशेला. जर तुम्ही ते पाळले नाही तर गरिबीचा सामना करावा लागू शकतो. स्वयंपाकघर तर नेहमीच व्यवस्थित ठेवायला हवं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहते. पण किचनमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवलेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. आज त्या विषयीच आपण जाणून घेऊया ज्या चुकूनही स्वयंपाक घरात ठेवू नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रीजमधलं कणिक
वास्तुशास्त्रानुसार मळलेले पीठ कधीही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. दुसरीकडे शिळ्या पिठाचा वापर केल्याने कर्करोगासारखे आजार होतात.


किचनमध्ये औषधे 
किचनमध्ये औषधे ठेवणे देखील अशुभ मानले जाते. असे म्हणतात की स्वयंपाकघरात औषधे ठेवल्याने माणूस अन्नाप्रमाणेच औषधे खाऊ लागतो. एकामागून एक अनेक आजार घरातील व्यक्तींना ग्रासण्याची शक्यता वाढते. विशेषत: घराच्या प्रमुखावर सर्वाधिक विपरीत परिणाम होतो.


हेही वाचा : मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य


तुटलेली भांडी 
किचनमध्ये तुटलेली भांडी कधीही ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी घरात दारिद्र्य आणतात. तुमच्या स्वयंपाकघरात अशी भांडी असतील तर ती लगेच काढून टाका. असेही मानले जाते की अशा भांड्यांमुळे घरात भांडणे आणि कलह वाढतात.


स्वयंपाक घरात मंदिर किंवा देवघर 
अनेकदा लोक स्वयंपाकघरात मंदिर किंवा देव्हारा स्थापन करतात. पण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही देवघर नसावे. असे करणे अशुभ मानले जाते. अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण-कांदा आणि तामसिक पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. असे केल्याने देवी-देवता कोपतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)