Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; `या` चुका अजिबातच करु नका
वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)
Vastu Tips : असं म्हणतात, की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. प्रत्येक वास्तू ही तिच्या परिनं प्रत्येकाला आशीर्वाद देत असते. अशा या वास्तूविषयीचे काही नियम जाणून घेणंही तितकंच महत्वाचं असतं. घर असो, कामाचं ठिकाण असो किंवा मग अभ्यासाचं. वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)
चला तर मग, जाणून घेऊया घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे काही महत्त्वाचे नियम
- घरातील इतर खोल्यांच्या तुलनेत मुख्य प्रवेशद्वार मोठं असावं. (Main door of home)
- घरासमोर वाहतं पाणी नसावं. असं असल्यास घरातील व्यक्तींना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो.
- घरासमोर रस्ता, मंदिर असल्यास घराच्या दारासमोर जास्त जागा सोडणं फायद्याचं ठरेल.
- घराच्या दारासमोर अगदी लगेचच लागून मंदिर असल्यास सुख नांदत नाही असं म्हणतात.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एखादा खांब असल्यास त्या घरातील महिलांना प्रकृती अस्वास्थ्याच्या समस्या भेडसावतात.
- घराच्या मुख्य दारासमोर मोठं झाड असल्यास त्याचा त्रास लहान मुलांना होतो.
वाचा : 'या' राशीच्या लोकांनी कधीच धारण करू नका लाल रंगाचा धागा, होईल नुकसान!
- घराच्या मुख्य द्वारासमोर रस्ता असेल तर, ही बाब फारशी फायद्याची नाही. असं असल्यास घराती मंडळींच्या विकासात बाधा येते.
- घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर- पूर्व, उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेला असावा. या दिशा भरभराट आणणाऱ्या असल्याची धारणा आहे.
- घराचा मुख्य दरवाजा भक्कम लाकडाचा असल्यास त्यामुळं घरामध्ये आनंद नांदतो. पण, यासाठी चांगल्या प्रतीच्याच लाकडाचा वापर करावा.