Vastu Tips  for Married Couple : लग्न होऊनही तुमच्या नात्यामधीसल गोडवा कमी झाला असेल तर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे तुमच्या नात्यामधील प्रेमाचा संवाद वाढू शकतो. यासाठी वेगळं काही नाही फक्त तुमच्या घरातील बेडरूममध्ये एका पक्षांचे फोटो लावायचे आहेत. (Vastu tips for married couple do these special measures in the bedroom love life will be stronger than before marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोपट या पक्ष्याला प्रेम, निष्ठा, दीर्घायुष्यसाठीचं प्रतीक मानलं जातं. चीनमध्ये पोपट या पक्ष्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरामधील बेडरूममध्ये पोपटाचे फोटो लावण्यास सांगितले आहेत. यामुळे तुमच्या नात्यात आनंद येईल आणि दोघांमधील प्रेम पूर्वीपेक्षा नातं अधिक घट्ट होईल.


व्यावसायिकांसाठीही पोपट शुभ मानला जातो. तुमच्या व्यवसायात उत्तर दिशा वास्तुशी संबंधित समस्यांपासून मुक्त ठेवण्यासाठी या दिशेला हिरव्या पोपटाचे चित्र लावा. याचा उपयोग तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा व्यवसायात पुरेपूर वापर करू शकाल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल.


घराच्या उत्तर दिशेला पोपटाचे फोटो लावावा. पोपटाचे चित्र या दिशेला लावल्याने मुलांची अभ्यासात प्रगती होण्यास मदत होते. मुलांच्या भविष्यासाठी ते फार महत्वाचं मानले जातात.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)