Vastu Tips For Money : असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरात झाडं लावायला आवडतात. घरात झाडं लावल्यानं घरातील वातावरणं शुद्ध राहते. काही विशिष्ट झाडं लावल्यानं तुमच्या घरातील वातावरण शुद्ध राहते. तर वास्तुशास्त्रानुसार अशी झाडं आहेत ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण ही सकारात्मक झालं. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात झाडं योग्य दिशेनं लावली तर तुमच्या आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळद (Turmeric Tree)  : हळदीचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते. हे रोप लावण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सगळ्यात चांगली मानली जाते. हे रोप घरात लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवाय हे रोपटं घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. 


मनी प्लान्ट किंवा क्रॅसुला (Money Plant)  : या वनस्पतीला जेड प्लांट असेही म्हणतात. असे म्हटले जाते की ते घरात लावल्याने धन आणि धान्य वेगाने वाढू लागते. ते मुख्य गेटजवळ प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस स्थापित केले जावे.


हेही वाचा : Vastu Tips For Kitchen : तुमच्याही किचनमध्ये आहे का 'ही' गोष्ट, तर आताच वाचा ही बातमी


तुळशी (Tulsi) : आपल्या प्रत्येकाचा घरात तुळशीचं रोपटं आढळतं. वास्तूनुसार हे रोपटं घरात सुख-समृद्धी आणण्याचे काम करते. परंतु या वनस्पतीची योग्य प्रकारे काळजी करणे गरजेचे असते. ते लावण्यासाठी योग्य दिशा ही पूर्व किंवा मग ईशान्य आहे. त्याशिवाय रविवारच्या दिवशी तुळशीला हात लावू नका. 


बांबूचे रोप (Bamboo Tree)  : घरामध्ये बांबूचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते असे मानले जाते. बांबूची छोटी रोपे लाल धाग्यात बांधून घराच्या उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येतात. अनेकजण ते ऑफिसमध्येही ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या 6 देठांमुळे पैसा लवकर आकर्षित होतो.


शमी (Shami Plant) : हे रोप घराच्या डाव्या बाजूला लावावे. तसेच नेहमी त्याची विधिवत पूजा करावी. असे मानले जाते की हे रोप घरात लावले की धन आणि धान्याची कमतरता नसते. वास्तूशाश्त्रानुसार , हे रोप संपत्तीला आकर्षित करते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)