vastu tips: घरात सतत होताहेत भांडणं..मुख्य दरवाजात करा हे छोटे बदल.. नांदेल सुख समृद्धी
घरातील सर्वांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कुटुंबातील कोणालाही कधीच पैशांची कमी भासत नाही. घरात सुख-समृद्धी राहते.
Vastu tips upay for happy life : आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्राचे (vastushastra) खूप महत्व आहे. घर असो किंवा ऑफिस मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो. (main door tips for home and office) वास्तूच्या दृष्टीने मुख्य दरवाजाच खूप वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे.
त्यामुळे मुख्य गेटच्या गोष्टींची खूप काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. असं केल्यास कुटुंबात आनंद निर्माण होतो. कुटुंबात आनंद टिकून राहतो आणि कार्यालयात प्रगती होते. वास्तुतज्ज्ञांच्या मते, काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील समस्या जस कि
नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात एक वेगळीच ऊर्जा राहून प्रसन्न वाटू लागत. चला तर जाणून घेऊया अशाच काही उपायांविषयी..
घरात कोणत्याही प्रकारचे भांडण होत असेल तर या वास्तु उपाय करून पाहा.
घराचे किंवा कार्यालयाचे मुख्य गेटवर पिंपळ आणि अशोकाच्या पानांनी सजावट करावी असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते. म्हणून कुठल्याही मंगल कार्यसमयी आपण में घेतला सुशोभित करतो.
स्वच्छतेची घ्या विशेष काळजी
गेटबाहेरकिंवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर नेहमी स्वच्छता ठेवावी. यासोबतच दारावर माता लक्ष्मीच्या पाऊलखुणा लावा. घरातील सर्वांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कुटुंबातील कोणालाही कधीच पैशांची कमी भासत नाही. घरात सुख-समृद्धी राहते.
तुळशीचं रोपटं आहे शुभ
मुख्य दरवाजाजवळ तुळशीचे रोप लावणे हे अतिशय खूप शुभ मानले जाते कारण तुळशीच्या रोपट्याचा संबंध भगवान विष्णूशी आहे.घराबाहेर तुळस लावल्याने नेहमी प्रसन्न वातावरण राहते.
स्वस्तिक काढणे शुभ
घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावणे अतिशय शुभ मानले जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वस्तिक चा संबंध नशीब आणि समृद्धीसोबत आहे.
मुख्य दरवाजा मोठा असावा
घराचे मुख्य दार किंवा ऑफिसचे मुख्य गेट हे इतर दरवाजांपैकी कधीही मोठं आणि प्रशस्त असायला हवे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असल्यास शुभ फळ मिळते.
टीप: (वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे ,झी २४ तास याची खातरजमा करत नाही )