घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका...
प्रत्येकाच्या घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात मात्र अनेकदा त्या फेकून देण्याऐवजी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्या जातात.
मुंबई : प्रत्येकाच्या घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात मात्र अनेकदा त्या फेकून देण्याऐवजी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्या जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार या वस्तू केवळ घराचे सौंदर्य बिघडवतच नाहीत तर वास्तुदोषही निर्माण करतात. वास्तुदोषामुळे नशीबही बदलते. जर तुमच्याही घरात अशा काही वस्तू असतील तर लगेचच त्या घरातून काढून टाका.
तुटलेली भांडी - अशा वस्तू घरात ठेवल्याने घरावर अशुभ प्रभाव राहतो. अशी भांडी घरात ठेवल्यास लक्ष्मी नाराज होते. यामुळे गरिबी येते. तुटलेली भांडी घरात असल्यास वास्तुदोषही निर्माण होतो.
तुटलेली काट - तुटलेली काच घरात असल्यास नकारात्मक एनर्जी निर्माण होते. तसेच कुटुंबातील सदस्यांना तणावाचा सामना करावा लागतो.
बंद घड्याळ - वास्तुनुसार घड्याळांची स्थिती आपल्या कुटुंबाच्या उन्नतीचे प्रतीक असते. घरातील घड्याळ बंद असेल तर प्रगती खुंटते. त्यामुळे घरात बंद पडलेली घड्याळे असल्यास लगेचच बदलून घ्या.
तुटलेला फोटो - घरात तुटलेला फोटो असल्यास तो लगेचच हटवा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.
तुटलेला दरवाजा - घरातील एखादा दरवाजा तुटलेला असल्यास तो लगेचच रिपेअर करुन घ्या. यामुळेही वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
फर्निचर - घरातील फर्निचरची स्थिती योग्य असावी. तुटलेले फर्निचर घरात ठेवू नये.