मुंबई : घरातील वनस्पती केवळ वातावरण ताजे, आनंददायी बनवत नाहीत, तर घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा देखील आणतात. त्यामुळे योग्य रोपांची निवड आणि त्यांना घरात ठेवण्याची दिशा खूप महत्त्वाची आहे, अन्यथा मनाला प्रसन्न करणारे झाड देखील आपल्या घरावर किंवा व्यक्तीच्या आयुष्यावर अशुभ परिणाम करु शकतात. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये झाडे लावण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराची दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. अशा परिस्थितीत या दिशेला रोपे लावणे चांगले नाही. विशेषत: अशा वनस्पती ज्यांना पूजनीय मानले जाते. अन्यथा घरातील सुख-शांती संपुष्टात येते आणि घरातील लोकांना त्यांच्या जीवनात दुःख आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते.


तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते आणि घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळते. असे केल्याने अनेक दुःखांना आमंत्रण मिळते.


आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मनी प्लांट अत्यंत महत्त्वाचा मानले जाते. या रोपाची योग्य दिशेला योग्य पद्धतीने घरामध्ये लागवड केल्यास जीवनात भरपूर सुख-समृद्धी येते. पण घराच्या दक्षिण दिशेला लावल्याने धनहानी होऊ शकते.


क्रॅसुला वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर घरामध्ये क्रॅसुलाचे रोप लावल्याने चमत्कारी परिणाम मिळतात. पण घराच्या दक्षिण दिशेला लावू नका. हे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ असते.


शमीची वनस्पती शनिदेवाशी संबंधित आहे. हे रोप घराच्या पूर्व किंवा ईशान्येला लावल्यास अनेक वास्तू दोष दूर होतात, पण दक्षिण दिशेला लावल्याने वास्तुदोष निर्माण होतात. शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये शनीचे रोप लावणे हा खूप चांगला उपाय आहे.


केळीचे झाड आणि वनस्पती भगवान विष्णूशी संबंधित आहेत. याची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो, तसेच कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो. गुरु ग्रह भाग्याचा कारक आहे. त्यामुळे हे शुभ रोप दक्षिण दिशेला लावणे देखील चांगले नाही.


परंतु हे झाड ईशान्य दिशेला ठेवणे खूप शुभ असते. हे रोप लावल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)